मेष या आठवडय़ामध्ये जे काम तुम्ही कराल त्यामधून आपली प्रतिमा उंचाविण्याचा प्रयत्न कराल. व्यापार-उद्योगात एखादा नवीन प्रकल्प हाती घ्यावासा वाटेल. स्पर्धकांवर नजर ठेवा. नोकरीच्या ठिकाणी एखादे वेगळे काम तुम्हाला हाताळावे लागेल. त्याचा उपयोग भविष्यात निश्चित होईल. घरामध्ये लहान आणि मोठय़ा व्यक्तींची तुमच्यावर भिस्त असल्यामुळे तुम्हाला तुमची जबाबदारी झटकून टाकता येणार नाही.

वृषभ ग्रहमान म्हणजे ‘मानलं तर समाधान’ अशी परिस्थिती निर्माण करणारे आहे. व्यापार-उद्योगात जी कामे पूर्वी तुम्ही लांबवलेली होती त्यामध्ये आता लक्ष घालणे भाग पडेल. ज्यांचा जोडधंदा आहे त्यांनी हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागू नये. नोकरीमध्ये वरिष्ठ एखादा निर्णय तुम्हाला विश्वासात न घेता घेऊन टाकतील. त्याचा तुम्हाला राग येईल. प्रवासाच्या वेळेला कागदपत्रे आणि आपली चीजवस्तू नीट सांभाळा. घरामध्ये तुमचे विचार योग्य असूनही इतरांना ते लगेच पटणार नाहीत. त्यांना विचार करायला वेळ द्या.

मिथुन या आठवडय़ात तुमच्या वागण्या-बोलण्यामध्ये एक प्रकारची विसंगती दिसून आल्यामुळे तुम्ही नेमके काय आहात याविषयी जवळच्या व्यक्तींना कोडे पडेल. व्यवसाय-उद्योगामध्ये जे काम तुम्ही हातात घ्याल ते कितीही कष्टदायक असले तरी पूर्ण करून दाखवाल. आíथक प्राप्ती सुधारल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. नोकरीमध्ये जे काम सहज आणि सोपे आहे ते पूर्ण कराल आणि वरिष्ठांवर छाप पाडाल. एखादी विशेष सुविधा मिळेल. घरामध्ये तुमच्या शब्दाला मान मिळेल.

कर्क ‘हौसेला मोल नसते’ या म्हणीची आठवण करून देणारे हे ग्रहमान आहे. वास्तविक पाहता साधी राहणी ठेवून चाकोरीबद्ध जीवन जगण्याकडे तुमचा कल असतो. व्यापार-उद्योगात गिऱ्हाईकांना खूश करण्याकरिता एखादी विशेष सेवा देण्याचे ठरवाल. पण भविष्यात त्यातून फायदा होईल. नोकरीमध्ये तुमच्याकडून काम करवून घेण्यासाठी वरिष्ठ तुम्हाला मधाचे बोट चाटवतील. जोडधंदा करणाऱ्यांना फायदा देणारा सप्ताह आहे. घरामध्ये एखाद्या महत्त्वाच्या कार्यक्रमाची पूर्वतयारी कराल.

सिंह स्थिर रास असे तुमच्या राशीचे वर्णन केले आहे. सहसा ठरलेला मार्ग बदलायला तुम्ही तयार होत नाही. या आठवडय़ात मात्र तुमचा प्रकार उलटा असेल. व्यापार-उद्योगात कमाई वाढविण्याकरिता गिऱ्हाईकांना खूश करावे लागेल. छोटे व्यापारी किंवा दुकानदार विशेष सवलत द्यायला तयार होतील. नोकरीमध्ये एखादे काम पूर्ण करण्याकरिता तुम्ही तुमच्या पद्धतीनेच काम कराल. घरामध्ये कोणालाही टाकून बोलू नका.

कन्या शांतपणे आणि नियोजनबद्ध काम करणारी तुमची रास आहे. तुमच्या कार्यपद्धतीमध्ये बदल केलेले तुम्हाला आवडत नाही. पण या आठवडय़ामध्ये कामाचा दर्जा सुधारण्याकरिता तुम्ही स्वत:हून काही बदल कराल. गिऱ्हाईकांना खूश करणे हे उद्दिष्ट लक्षात ठेवून एखादी नवीन कल्पना अमलात आणाल. नोकरीच्या ठिकाणी भरपूर काम करण्याची तुमची उमेद असेल. वेळेची बचत करण्याकरिता एखादा नवीन तोडगा शोधून काढाल. घरामध्ये प्रिय व्यक्तीला खूश करून तुमची मागणी पूर्ण करून घेण्याचा इरादा असेल.

तूळ चार ग्रह तुमच्यावर प्रसन्न आहेत. जरी अडथळे आले तरी त्याचा जास्त विचार न करता तुम्ही मोठय़ा धीराने पुढे जात रहावे. व्यापार-उद्योगात एकंदरीत कामाचे प्रमाण चांगले राहील. सरकारी कामे किंवा कोर्टव्यवहार मार्गी लागतील. आíथक  व्यवहारात स्वत: जातीने लक्ष घाला. नोकरीमधील वातावरण तुमच्यातील कौशल्याला पूरक असेल. तुम्हाला भरपूर काम करावेसे वाटेल. घरामध्ये सर्वाच्या गरजा भागवण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. त्यामुळे तुमचे कौतुक होईल.

वृश्चिक कोणत्याही बंधनात खूप काळ अडकून पडणारी तुमची रास नाही. आता सीमेवरच्या जवानाप्रमाणे तुमचे एकमेव ध्येय असेल, ते म्हणजे बरीच प्रगती करायची. व्यापार-उद्योगात स्वत:च्या आवडीनिवडी बाजूला ठेवून गिऱ्हाईकांना प्राधान्य द्याल. जाहिरात, जनसंपर्क यासाठी वेळ पसे खर्च कराल. जोडधंदा असणाऱ्यांना मनाप्रमाणे काम करण्यासाठी धडपड करावी लागेल. नोकरीत कामाचा ताणतणाव वाढत राहील. घरात वस्तूंची मोडतोड, दुरुस्त्या वगरे कारणाकरिता पसे खर्च होतील.

धनू वरून जरी तुम्ही शांत दिसत असलात तरी मनात बरीच खळबळ चालू असेल. आपले काम मनाप्रमाणे होत नाही, ही भावना तुम्हाला मधूनच अस्वस्थ करेल. बाजारातील घडामोडींकडे बारकाईने लक्ष द्या. खेळत्या भांडवलाकरिता कर्ज काढावे लागेल. नोकरदार व्यक्तींनी चूक टाळण्यासाठी एका वेळी एकच काम करावे. घरामध्ये काही खर्च तुमच्यामुळे, तर काही खर्च अनेपक्षित कारणामुळे होतील. चार पसे हातात राखून ठेवा.

मकर कामाचा तुम्हाला कधी कंटाळा येत नाही, पण या आठवडय़ात मात्र दैनंदिनीमध्ये काहीतरी बदल व्हावा असे तुम्हाला वाटेल. व्यापार-उद्योगात मालाची विक्री, फायदा वाढविण्याच्या दृष्टीने काही खास बेत कराल. हे बेत स्पर्धकांना कळणार नाहीत याची दक्षता घ्या. पशाची आवक साधारण राहील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांना जी कामे महत्त्वाची वाटतात त्यावरच लक्ष केंद्रित कराल. बाकी गोष्टी पुढे लांबवाल. घरामध्ये एखादा छोटासा कार्यक्रम ठरेल. त्यानिमित्ताने नातेवाईकांना भेटण्याचा योग येईल.

कुंभ व्यक्तिगत प्रगती आणि नतिक कर्तव्य यामध्ये महत्त्व कशाला द्यायचे असा तुमच्यापुढे प्रश्न असेल. व्यापार-उद्योगात बरेचसे काम उधारीचे असल्यामुळे रोख रक्कम हातात राहणार नाही. एखादा जुना प्रश्न विनाकारण डोके वर काढेल.  नोकरीच्या ठिकाणी जो काम करतो त्याच्याच मागे काम लागते असा अनुभव येईल. सहकारी आणि वरिष्ठ तुमच्यावर काम सोपवून निर्धास्त राहतील. घरामध्ये एखादा कार्यक्रम तुम्ही ठरवाल, पण आयत्या वेळी त्यामध्ये बदल करावे लागतील.

मीन सहसा तुम्ही नेहमीच्या सवयी आणि रूढी सोडत नाही, पण या आठवडय़ात स्वत:च्या फायद्याकरिता हे सर्व करायला तयार व्हाल.  व्यापार-उद्योगाच्या कामात आधुनिकता आणण्याचा विचार मनात येईल. व्यावसायिक जागेचे नूतनीकरण कराल. पशाची आवक गरजेपुरती असेल. नोकरीच्या ठिकाणी तुमचा मानसिक उत्साह खूप असेल. घरामध्ये सगळ्यांनी आपले ऐकावे यासाठी एखादी युक्ती शोधून काढाल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com