21 July 2017

News Flash

१७ ते २३ फेब्रुवारी २०१७

जास्त विचार करत बसण्यापेक्षा कृती करण्यावर तुमचा भर असतो.

विजय केळकर | Updated: March 1, 2017 12:16 PM

राशिचक्र

01vijay1मेष जास्त विचार करत बसण्यापेक्षा कृती करण्यावर तुमचा भर असतो. पण या आठवडय़ात ‘शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ’ या म्हणीची आठवण ठेवा. व्यापार-उद्योगात सध्या चालू असलेले काम हळूहळू गती घेईल. नोकरीच्या ठिकाणी अवघड काम सोपे होण्यासाठी तुम्हाला शॉर्टकट मिळेल. तुमचे भविष्यातील बेत भावनेच्या भरात सहकाऱ्यांना बोलून दाखवू नका. घरामधल्या एखाद्या प्रश्नावर तुम्ही उगीचच चिडाल.

वृषभ प्रत्येक काम हातात घेण्यापूर्वी तुम्ही उत्तम प्रकारे नियोजन करता. त्यामुळे सहसा तुम्हाला अपयश येत नाही.  या आठवडय़ामध्ये ‘सबसे बडा रुपया’ या म्हणीप्रमाणे तुम्ही पशाच्या मागे लागाल. व्यापार उद्योगात रेंगाळलेली काही कामे गती घेतील. नवीन प्रोजेक्टकरिता नवीन व्यक्तीच्या ओळखी व सहवास उपयोगी पडेल. नोकरीतल्या कामानिमित्त संस्थेकडून विशेष सुविधांकरिता तुमची निवड होईल. त्याच्या बदल्यात वरिष्ठ तुमच्याकडून भरपूर काम करून घेतील. त्याचा कंटाळा येईल. घरामध्ये कामाच्या वेळेला सगळ्यांना तुमची आठवण येईल.

मिथुन शक्ती आणि युक्ती या दोन्हींचा योग्य प्रकारे वापर करून या आठवडय़ात तुम्ही तुमचा मतलब साध्य कराल. दीर्घकाळानंतर एखाद्या व्यक्तीशी गाठभेट झाल्यामुळे तुम्हाला बरे वाटेल. व्यापार-उद्योगामध्ये मात्र कोणताही निर्णय घाईने कार्यान्वित करू नका. परदेश व्यवहारांना चालना मिळण्याची शक्यता आहे. नोकरदार व्यक्तींना स्वत:चे कौशल्य वाढवण्याकरिता एखादे नवीन प्रशिक्षण घ्यावेसे वाटेल. सांसारिक जीवनात छोटय़ा-मोठय़ा कारणावरून मतभेद होतील.

कर्क या जगात कोणतीही गोष्ट चिरकाळ टिकत नाही. काही विशिष्ट कालावधी गेला की सभोवतालची परिस्थिती बदलायला सुरुवात होते. याचा अनुभव आता तुम्हाला येईल. जे काम तुम्ही गेल्या दोन-तीन वर्षांत सुरू केले होते ते आता थांबण्याची किंवा बदलण्याची शक्यता आहे. व्यापार-उद्योगात स्पर्धकांच्या दबावामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल. नोकरीमध्ये जो काम करतो त्याच्याच मागे काम लागते असा अनुभव येईल. घरामध्ये सर्व आघाडय़ांवर तुम्हाला सतर्क रहावे लागेल.

सिंह कष्टाला तुम्ही कधीच कमी पडत नाही, पण तेच काम करावे लागले की तुमची थोडीशी चिडचिड होते. या आठवडय़ात कोणीतरी चूक केल्यामुळे तुम्हाला विनाकारण भरुदड सहन करावा लागेल. व्यापार-उद्योगात ते काम सहज वाटले होते त्या कामात गुंतागुंत निर्माण होईल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या उदार स्वभावाचा वरिष्ठ आणि सहकारी गरफायदा घेतील. घरामध्ये सगळ्यांशी वागताना तुमच्या सहनशीलतेची परीक्षा होईल.

कन्या जी गोष्ट तुम्ही मनामध्ये आणाल ती पूर्ण करण्याकरिता कोणतेही धाडस करण्याची तुमची तयारी असेल. व्यापारामध्ये उलाढाल आणि फायद्याचे प्रमाण वाढविण्याकरिता काहीतरी नवीन करावेसे वाटेल. सध्या चालू असलेले काम तुम्हाला अपुरे वाटल्याने एखादी नवीन शाखा उघडावीशी वाटेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचा दर्जा उत्तम राहील. काही जणांना थोडय़ा अवधीकरिता परदेशात जाण्याची संधी मिळेल. घरामध्ये सर्व काही चांगले असेल. पण किरकोळ कारणावरून एखाद्या व्यक्तीशी दुरावा निर्माण होईल.

तूळ एखादे काम करताना तुम्ही त्यावर खूप विचार करता, त्यामुळे कृतीकरिता तुमचा वेग मात्र विचार आणि कृती या दोन्हींचा चांगला समन्वय साधून तुम्ही तुमचे काम पूर्ण कराल. व्यापार-उद्योगात जे काम कठीण वाटले होते त्यामध्ये तुम्ही काहीतरी युक्ती शोधून काढाल. त्याचा स्पर्धकांवर मात करायला उपयोग होईल. नोकरीमध्ये वरिष्ठ तुम्हाला गोंजारून, चुचकारून तुमच्याकडून काम करून घेतील. घरामध्ये सगळ्यांची आपुलकीने काळजी घ्याल.

वृश्चिक जास्त प्रयत्न न करता जे सहजगत्या मिळेल त्यावर समाधान मानायचे असे तुम्ही ठरवाल. परंतु हा तुमचा निश्चय फार काळ टिकणार नाही. वेळ पडल्यास त्याकरिता एखादा धाडसी निर्णय घेण्याची तुमची तयारी असेल. व्यापार-उद्योगात सर्व कामे एकटय़ाने हाताळू नका. पशाच्या कामांना प्राधान्य देऊन इतर गोष्टी हाताखालच्या व्यक्तींवर सोपवा. नोकरीच्या ठिकाणी स्वत:च्या कामाला प्राधान्य द्या. घरामध्ये तुमच्या जबाबदाऱ्या वाढण्याचे संकेत मिळतील.

धनू तुम्हाला काय वाटते याला महत्त्व नसून काळानुसार बदलावे लागेल. व्यापारी वर्गाला एखादी नवीन कल्पना सुचेल. ती प्रत्यक्षात उतरवण्यापूर्वी त्यातील जमा-खर्च समजून घ्या.  ज्यांचा जोडधंदा आहे त्यांना त्यातून मिळणाऱ्या पशांचा आधार वाटेल. नोकरीच्या ठिकाणी एखादे वेगळे काम तुमच्यावर सोपवले असेल तर ते पूर्ण करण्यातच वेळ जाईल. घरामध्ये तुम्ही सुचवलेला एखादा मार्ग सगळ्यांना उपयोगी पडेल.

मकर कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही खूप विचार करता. पण या आठवडय़ात एखादा निर्णय बेधडकपणे घेण्याचे धारिष्टय़ तुमच्यात निर्माण होईल. व्यापार-उद्योगात पूर्वी केलेल्या कामातून वसुली करण्याचा प्रयत्न करा. अति पशाच्या मोहाने स्वत:च्या मर्यादेबाहेर जाऊ नका. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला जादा अधिकार मिळाल्याने तुम्ही थोडेसे फुगून जाल. मात्र बोलून आणि कृतीने कोणाचाही अपमान करू नका. घरामध्ये एखाद्या विषयावरून इतरांशी मतभेद होतील. तुमचे सडेतोड विचार त्यांना पसंत पडणार नाहीत.

कुंभ ग्रहमान स्फूíतदायक आहे. एकेकाळी ज्या कामाविषयी तुम्हाला बिलकुल आत्मविश्वास नव्हता ते काम कधीही वाया जात नाही याची प्रचीती येईल. वसुली किंवा इतर मार्गाने हातात पसे पडतील. नोकरीमध्ये एखाद्या कामासाठी वरिष्ठ तुमच्यावर अवलंबून राहतील. तुम्हाला त्याचा अभिमान वाटेल. मात्र तुमचे कष्ट वाढतील. घरामध्ये तुमचे विचार तुम्ही इतरांना पटवून द्याल. तुमच्या खऱ्या हितचिंतकांकडून मदत मिळेल. लांबलेले शुभकार्य निश्चित होईल. खाण्यापिण्यावर बंधन ठेवा.

मीन परोपकारी रास असे तुमच्या राशीचे वर्णन केले जाते. या आठवडय़ात त्याचा प्रत्यय येईल. स्वत:चा काहीही फायदा नसताना तुम्ही कोणाला तरी मदत कराल. व्यापार-उद्योगात एकंदरीत कामकाज समाधानकारक राहील. अपेक्षित पसे हाती पडतील.  जुनी देणी वेळीच देऊन टाका. नोकरीतील कामाच्या निमित्ताने एखाद्या नवीन व्यक्तीशी मत्री होईल. तुमचा कामाचा झपाटा चांगला राहील. घरामध्ये सर्वाना तुमचा आधार वाटेल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

First Published on February 17, 2017 1:05 am

Web Title: astrology from 17 to 23 february 2017
  1. No Comments.