‘घराणेशाहीची गरज’ या अग्रलेखावर प्रथम पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांने मांडलेले मत.

Difficulties in the redevelopment of redeveloped buildings
मुंबई : पुनर्विकसित इमारतींच्या पुनर्विकासात अडचणी!
24 tree fall due to unseasonal rain in pimpri chinchwad
पिंपरी : अवकाळी पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यामुळे २४ ठिकाणी झाडपडीच्या घटना
Among the vehicles inspected by the RTO 14 percent of the vehicles are polluting
मुंबई : आरटीओने तपासलेल्या वाहनांमध्ये १४ टक्के वाहने प्रदूषणकारी
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम

मळकटलेल्या कपडय़ांवर रानामध्ये बाप ढोरांसारखा राबतो आहे; पोरगं माझं साहेब होईल, या आशेवर तो जगतो आहे. माझा बाप दिवसरात्र शेतामध्ये राबून घर चालवतो. ना घरच्यांसाठी पुरेसा वेळ ना त्याच्या स्वत:साठी. शेती म्हणजे माझ्या आईची सवतच. खूप काबाडकष्ट करूनही कुटुंबाच्या गरजा भागतील असं उत्पन्न नसतं. ना केलेल्या कामाचं चीज होतं. इतकं सारं शेतकऱ्यांच्या कुटुंबाच्या वाटय़ाला येत असेल तर कोण स्वत: करिअर म्हणून शेतीकडे वळेल वा कोणता बाप स्वत:च्या पोराला शेतात राबवेल. स्वत:च्या वाटय़ाला आलेले हाल पोरांच्या वाटय़ाला येऊ नये म्हणून शेतकरी आयुष्याकडून घेतलेला धडा त्यांच्या पुढच्या पिढीला शिकवून त्यांनी शेतामध्ये न खपता मोठं साहेब व्हायची स्वप्न बघतात. यामध्ये त्यांची चूक नाही. चूक आहे ती आपल्या विचारसरणीची आणि आधुनिकतेकडे पाठ फिरवण्याची. आजकाल शाळा-कॉलेजमध्ये शिकणाऱ्या कोणत्याही मुलाचे ध्येय शेतकरी हे नसते. त्याचं स्वप्न डॉक्टर, इंजिनीअर, अधिकारी होईन; नाहीतर स्वत:चा व्यवसाय सुरू करेन. जर सगळ्यांनीच शेतीकडे पाठ फिरवली तर मग अन्नदाता कोण? जगाचा पोिशदा हा अन्नदाता असतो. पण प्रत्येकाने शेतीपासून दूर जाणे म्हणजे समस्त मानवजातीसाठी धोक्याची घंटा आहे. यावर त्वरित उपाय शोधणे आणि अवलंबणे जरुरीचे आहे. शेतीकडे न वळण्याचं माझ्या दृष्टीने पहिलं कारण म्हणजे कमी उत्पन्न. केलेल्या कामाचं समाधान शेतकऱ्याच्या नशिबी नसतंच. एकीकडे सात ते आठ तास नोकरी करणारा नोकरवर्ग आणि दिवसरात्र शेतात राबणारा शेतकरी यांच्या उत्पन्नाचा विचार केला तर कामाचं दाम शेतकऱ्याला मिळत नाही. जेव्हा उत्पन्न भरपूर मिळू लागेल तेव्हा तरुण पिढी शेताचा विचार करू लागेल; पण आता प्रश्न येतो की उत्पन्न कसं वाढवायचं? उत्पन्न वाढवणं शक्य आहे; परंतु त्यासाठी शेती करण्याची पद्धत आधुनिक केली पाहिजे. पण अशिक्षित असलेला शेतकरी ही आधुनिक शेती स्वीकारण्यासाठी धजावत नाही. यासाठी शेतकऱ्यांमध्ये जागृती करणे आणि उत्पन्नवाढीबद्दल मार्गदर्शन करणे काळाची गरज आहे. उत्पन्नवाढीला जोडूनच आणखी एक मुद्दा जो नेहमीच चच्रेचा विषय असतो तो म्हणजे कर्जमाफी. फक्त कर्ज माफ करून शेतकरी सुखी होणार नाही हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विचार नक्कीच योग्य आहे; परंतु शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी ठोस अशी पावले उचलल्याचे जाणवत नाही. शेतकऱ्यांची काम करण्याची तयारी असते, पण योग्य मार्गदर्शकांची कमतरता शेती क्षेत्रात जाणवते. जर शेतीविषयी ज्ञान देणारे मार्गदर्शक उपलब्ध झाले तर उत्पन्न वाढ होईल आणि या क्षेत्रातील पसा तरुणांना आकर्षित करून शेतीमध्ये कार्यास प्रवृत्त करेल.

शेती हे करिअर क्षेत्र न निवडण्याचं दुसरं कारण म्हणजे शेतीसाठी आवश्यक बाबींची कमतरता. यातील पहिली कमतरता वरील उल्लेखाप्रमाणे मार्गदर्शकाची (मार्गदर्शक म्हणजे पारंपरिक पद्धतीने शेती करणारे नसून आधुनिक शेतकरी). जीवनात कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शकाची गरज असते. तोच मार्गदर्शक शेतीसाठी मिळावा आणि तळागाळातल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा. त्याचबरोबर पाण्याची कमतरता ही एक समस्या शेतकऱ्यांना शेतीपासून परावृत्त करीत आहे. सिंचन, शेततळे, कालवा; तसेच इतर योजनांमुळे पाण्याची गरज भागत आहे, पण काही भागांत अजूनही पाण्याची समस्या भेडसावते. यानंतरची आवश्यक बाब म्हणजे उत्तम दर्जाचे बी-बियाणे, त्यासाठीचा खर्च हा प्रश्नदेखील शेतकरी वर्गासमोर असतो. बियाणे वापरतानादेखील शेतकरी चांगल्या जातीचे बियाणे न घेता कमी पशांचे बियाणे पेरून मोकळे होतात. सरकारने शेतकऱ्यांना १९६० सालापासून Intensive Agriculture Development program(IADP) अंतर्गत कर्ज, बियाणे आणि शेतीची अवजारे उपलब्ध करण्याची सोय केली आहे; परंतु सरकारने शेतीपूरक आखलेल्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात यंत्रणा असफल ठरली आहे, हे मान्य करावे लागेल आणि यामध्ये सुधारणा करून शेतीला नवसंजीवनी द्यावी. यानंतरचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन. एकीकडे शेतकऱ्याला जगाचा पोिशदा, अन्नदाता म्हणवतो परंतु खरेच शेतकऱ्यांचे समाजातील स्थान अन्नदाता म्हणण्यासारखे आहे का? शेतीकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे. ज्याला इतर कोणत्या क्षेत्रात काम मिळत नाही, तो शेतीत पडतो अशी सर्वसाधारण समजूत आहे. त्यामुळे आजची तरुण पिढी तीन ते चार हजार रुपयांच्या पगारावर काम करेल; पण शेतीला प्रथम प्राधान्य देत नाही. याचबरोबर लग्नाच्यावेळीही मुलाला सरकारी वा खासगी नोकरी असेल तरच लवकर मुलगी मिळते, अन्यथा घरची शेती बघून मुलगी एखाद्याच्या घरी देण्याची जुनी विचारसरणी संपल्यात जमा आहे. यासाठी शेतकरी शेतीमध्ये नावारूपाला येऊन एखाद्या कुटुंबाचा जगण्याचा भक्कम आधार बनेल, तेव्हाच समाजाचा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. एकूणच शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलवायचा असेल तर शेतकऱ्यांनी शेती करताना आधुनिकतेची कास धरली पाहिजे, तसेच शेतीला जोडूनच व्यवसाय करणे उत्पन्न वाढविण्यास मदतगार ठरेल. जोडव्यवसाय करण्यासाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. त्याबद्दल स्वत: चौकशी करून लाभ करून घ्यावा. सरकारी यंत्रणाही समाजमाध्यमांमुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहोचविण्यात यशस्वी होऊ शकतात. त्याचबरोबर शेतीत नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करणेदेखील आधुनिक शेतकरी घडवेल आणि ते समाजापुढे आदर्श निर्माण करतील. त्यामुळे लोकांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि पुढची पिढी शेतीकडे वळू लागेल. तेव्हा खऱ्या अर्थाने शेती ‘सुजलाम सुफलाम’ होईल आणि आपला अन्नदाता संपावर न जाता जगाला पोसण्याचे काम करेल. त्यामुळे गरज आहे ती पारंपरिक शेती पद्धतीत न अडकता आधुनिक शेती करणाऱ्या आधुनिक शेतकऱ्यांची.

(नानासाहेब महाडिक अभियांत्रिकी महाविद्यालय, पेठ)