मुरुड येथे झालेल्या अपघातानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सुरक्षेसाठी महाविद्यालये आणि स्थानिक प्रशासन जेवढे जबाबदार आहेत तेवढेच विद्यार्थीही आहेत. यामुळे सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांसाठी आखून देण्यात आलेले नियम सर्व विद्यार्थ्यांनी पाळणे तितकेच महत्त्वाचे आहे असे विद्यार्थ्यांना वाटते.

cam02   महाविद्यालयातील सुरक्षितता तपासून पाहण्याची गरज आहे. या अपघातांसाठी कुणी एक व्यक्ती जबाबदार नसून ती साऱ्यांची जबाबदारी आहे. मुरुडच्या घटनेनंतर शिक्षकांचे विद्यार्थ्यांवर नियंत्रण नसणे, त्याशिवाय स्थानिक व महाविद्यालयीन प्रशासनाने धोक्याची ठिकाणे, असुरक्षित जागा आणि एकंदर साऱ्या परिस्थितीचा आढावा घेऊन सहलींना जाणाऱ्यांना सतर्क करणे व आवश्यक ठिकाणी स्थानिक प्रशासनाने सुरक्षारक्षक नेमणे गरजेचे आहे. हा एक महत्त्वाचा भाग जरी असला तरी विद्यार्थ्यांनी आपली जबाबदारीही टाळून चालणार नाही. विद्यर्थ्यांची नैतिक जबाबदारीही अतिशय महत्त्वाची आहे. जाणकारांच्या सूचनेचे पालन करणेही गरजेचे आहे. जिवावर बेतणाऱ्या कृती टाळून धोक्याच्या ठिकाणी योग्य काळजी घेतली तर सहलीचा आनंद निश्चितच
घेता येईल.
– प्रियांका मयेकर, रुपारेल महाविद्यलय, प्रथम वर्ष, विज्ञान शाखा

cam03मुरुडच्या घटनेला तीन गोष्टी कारणीभूत आहेत. आपली प्रशासन व्यवस्था, विद्यर्थ्यांना घेऊन गेलेले शिक्षक आणि ते विद्यर्थी स्वत:. एखाद्या ठिकाणी दुर्घटना घडली की, सगळी व्यवस्था जागी होते आणि तिथे ती पुन्हा होणार नाही यासाठी उपाययोजना केल्या जातात. पण अशी घटना घडल्यानंतर त्यावर उपाययोजना करणे हे दुर्देवी आणि केलेल्या उपाययोजना ही त्या घटनेचा प्रभाव असेपर्यंत. प्रभाव ओसरला की पुन्हा परिस्थिती जैसे थे! मात्र व्यवस्था आणि शिक्षक यांच्यापेक्षा जबाबदारी हटकून चालणार नाही. मुरुडला झालेली घटना असो किंवा सेल्फी प्रकरण असो. बऱ्याचदा मुलांचा अतिउत्साह याला कारणीभूत ठरतो. विशेष म्हणजे धोक्याची ठिकाणे, पर्यटन स्थळे अशा ठिकाणी सरकारने सतर्क राहून धोक्याची सूचना देणारी उपकरणे बसवली पाहिजे आणि सुरक्षारक्षकांची पथकेही नेमली पाहिजेत.
– नितेश रायकर, महर्षी दयानंद महाविद्यलय, तृतीय वर्ष, कला शाखा

camp04विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची सर्वस्वी जबाबदारी ही महाविद्यलयाच्या प्रशासनावर असते. मुरुडची घटना असो किंवा महाविद्यलयात घडणाऱ्या घटना असतील. यामधून शिक्षणव्यवस्थांची दुर्बलताच पाहायला मिळते. महाविद्यलयातील विद्यर्थ्यांंच्या सुरक्षिततेचे नियम लिखित स्वरुपातच राहतात, त्यावर अंमलबजावणी होते का हा प्रश्नच आहे. कित्येक महाविद्यलयात तर ओळखपत्राचेही बंधन नसते. महाविद्यलयांमध्ये सी.सी.टी.व्ही बंधनकारक करणे गरजेचे मुख्य म्हणजे ते सुस्थितीत असायला हवे. हे सर्व प्रशाकीय पातळीवरचे नियम आहेत मात्र विद्यर्थ्यांंनी स्वसंरक्षणासाठी सदैव तत्पर असायला हवे.
– श्रद्धा भालेराव, एस.एन.डी.टी. महाविद्यलय, तृतीय वर्ष, कला शाखा

cam04विद्यार्थ्यांनी स्वत:च्या सुरक्षिततेची जबाबदारी आपणहून स्वीकारायला हवी. विद्यर्थ्यांंनी आपली मजा मस्तीची पातळी तपासायला हवी. महाविद्यलात नवीन विद्यर्थ्यांसोबत रॅगींगमुळे देखील अनेक विद्यर्थ्यांचे मानसिक खच्चीकरण होत असते मात्र यावेळी महाविद्यलयातील शिक्षकांशी संवाद असला तर प्रश्न सुटू शकतो. कारण नेहमीच कागदावरच्या नियमांचा उपयोग होत नसतो यासाठी आता विद्यर्थ्यांनी जागरुक राहायला हवे. सुरक्षिततेसाठीच्या नियमांचे प्रामाणिकपणे पालन केल्यास चिंता नाही.
– वृषाली गांवकर, घनश्यामदास सराफ महाविद्यलय, द्वितीय वर्ष, वाणिज्य शाखा