दोन लेक्चरमधील मोकळा वेळ. महाविद्यालयाच्या आवाराच्या बाहेर एखादी टपरी. टपरीवरील शेगडी वा स्टोव्हवर चहा वाफाळत आहे. बदामी रंगाच्या चहा भांडय़ात बघून कुणी मोहवणार नसेल तरच नवल! वेळेला चहा लागतोच मला, ही अनेकांच्या तोंडचं वाक्य. कार्यालयात, कामाच्या ठिकाणी अनेकदा ऐकायला मिळते. महाविद्यालयात हे चित्रही सर्वत्र नजरेस पडतेच. मित्रमैत्रिणींचा घोळका उत्साहाने उधाणलेला चहा ओठी लावण्यासाठी कधीही तयार असतो. मैत्री, वाद आणि कशावरही चर्चा ही चहानेच सुरू होते. अशा चहावर कॅम्पस कट्टामध्ये रंगलेली ही चर्चा..

पूर्वी कॉफी पिणं म्हणजे ‘स्टेटस सिम्बॉल’ समजले जायचे. त्यामुळे बरेच कॉफीबहाद्दर होते. पण आजच्या काळात बदल होत चालला आहे. रात्री उशिरापर्यंत म्हणजे ‘लेट नाइट कॉफी’सोबत तरुणाईमध्ये चहासोबतच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत. या ट्रेण्डने सध्या जोर धरलाय. भारतीयांच्या अंगी चहा भिनला आहे. म्हणून त्याची संगत अनेकांना सोडवत नाही. अगदी कितीही काटेकोर जीवन जगणारे लोक असले तरी सकाळी आणि सायंकाळी चहाचा एक घोट घशाखाली उतरतोच. एका अर्थाने चहाचे व्यसनच शंभरातल्या नव्याण्णव जणांना जडलेले असते.

quarantine ship in mauritus
मॉरिशसमध्ये अख्खे जहाजच केले क्वारंटाईन; ३,००० हून अधिक लोक अडकले समुद्रात; नेमके प्रकरण काय?
Who is Mufti Salman Azhari
…म्हणून वडोदरा पोलिसांनी इस्लामिक धर्मगुरूला पुन्हा केली अटक, कोण आहेत मुफ्ती सलमान अझहरी?
Sharad Pawar
तुतारी चिन्हाचं रायगडावर अनावरण, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “रणशिंग फुंकायला…”
BJP leader Suvendu Adhikari (L) with IPS officer Jaspreet Singh (R). (Express)
“पगडी घातली म्हणजे मी खलिस्तानी नाही, माझ्या धर्मावर…”,पोलीस अधिकाऱ्याने भाजपाला सुनावले

चहा चवीने पिणारेही अनेक जण आहेत. शहरातील प्रत्येक कोपऱ्यावर चहाची चव वेगळी. चहाच्या आस्वादानंतर ताजेतवाने वाटते. यातून काही जण ऊर्जाही मिळते. लेखकांसाठी चहा तर जन्माचाच सोबती. कल्पना सुचणं हे चहाच्या प्रत्येक घोटागणिक बहुतेकांना जमतं, असं अनेक जण खासगीत बोलत असतात. परीक्षाकाळात चहाची मग परीक्षाच असते. तो अधिकाधिक कडक असावा आणि त्याच्या प्राशनाने ताण कमी व्हावा, यासाठी हट्ट मांडून बसणारेही अनेक विद्यार्थी पाहायला मिळतात. मग कपावर कप खाली होत जातात. काहींचे चहा हे औषध असते.

चहापानासाठी विद्यार्थी मध्यरात्रीही गटागटांनी बाहेर पडतात. त्यामुळे टपऱ्यांवरचा चहा कॅफेज्मध्येही मिळू लागला आहे. सीसीडी, बरिस्ता या कॅफेज् चहापिऊंची अमाप गर्दी असते.

‘टी-पोस्ट’, ‘टी-व्हिला’, ‘टी-पी’ असे नवे गडी चहा निर्मितीसाठी ठेले टाकून ग्राहकांची वाट पाहत उभे आहेत. इतकी चहाची प्रसिद्धी वाढत आहे. कॅफेज्मध्ये विविध स्वादाच्या चहाबरोबर पोहे, उपमा, बनमस्का, पास्ता हे पदार्थ उपलब्ध आहेत.

टी-पी काय..

कॉफी कॅफेच्या संकल्पनेवर आधारित चहाप्रेमींसाठी पार्थ पटेल आणि अंकित उपाध्याय यांनी ‘टी-पी’ कॅफेज् सुरू केले आहेत. आम्ही दोघंही पहिल्यापासून चहाप्रेमी आहोत. त्यामुळे आम्ही यावर अभ्यास केला आणि त्यात असा लक्षात आला की मुंबईत सुमारे ५० चहाचे कॅफे आहेत. येथे आरामात बसून हवा तेवढा वेळ टाइमपास करता येतो. त्यातूनच आम्हाला ही ‘टी-पी’ ची कल्पना सुचली. महाविद्यालयीन मुलांना आता सीसीडी वगैरे गोष्टींचा कंटाळा आला आहे. त्यामुळे बरेच जण परत चहाकडे वळले आहेत, असे आम्हाला वाटते. तसेच आम्ही तरुणाईला भावेल, असा माहोल तयार करीत आहोत. विद्यार्थ्यांना रोज सीसीडीत जाऊन कॉफी पिणे शक्य नाही, पण ते रोज चहाचा आस्वाद घेऊ  शकतात. अशा किमतीत आणि विविध प्रकारचे चहा आम्ही येथे बनवतो. शिवाय आजचा तरुण आरोग्याविषयी जागरूक आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ग्रीन टी, हर्बल टी तयार केला जातो. सुरुवातीला कॅफेचे लोकेशन, मुलांना आवडेल असे वातावरण, मेन्यू आणि ग्राहकांना चांगल्या पद्धतीने सेवा देणे या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात, असे अंकित सांगतो.

चहा म्हणजे ऊर्जा

व्यसन म्हटले की आपल्याकडे अनेक जण नाके मुरडतात; परंतु चहाचे व्यसन काहींना आवडतेच. चहाने मला सकारात्मक ऊर्जा मिळते. अंगात उत्साह संचारतो. केवळ चहाच मिळून उपयोग नाही, तर त्याची चवही तितकीच महत्त्वाची आहे. त्यातून एक समाधान आहे. चहाचा कप हातात घेऊन चर्चा करणे, हा त्यातील महत्त्वाचा भाग आहे.

 – निनाद गोरे

टी शॉपउत्तमच

याआधी चहाची चांगली ठिकाण नव्हती म्हणून ‘कॉफी डे’मध्ये जावं लागायचं. पण आता ही अडचण दूर झाली आहे. चहाची दुकानं उघडल्यामुळे अनेकांच्या चर्चेला ऊत आला आहे. टी-शॉपमध्ये जाऊन मित्रांबरोबर गप्पा, प्रोजेक्ट करणं सोपं जातं. इथे वेळ घालवणं कधीच उत्तमच वाटतं.

 –अदिती रत्नपारखी

चहाची गोष्ट न्यारीच

माझ्यासाठी चहा म्हणजे सर्वस्व आहे. टपरीवरचा चहा म्हणजे खिशाला परवडणारा, शिवाय चहावाल्या काकांचा उधारीचा अड्डा. स्वत:ची मतं निर्भीडपणे मांडण्याचे एक साधन म्हणजे चहा आहे. मित्रांच्या सुख-दु:खात सामील होण्याचं ठिकाण म्हणजे टपरी.

सुमित कांबळे.

मी आणि माझा चहा

महोसत्वांच्या काळात टपरीवरच्या चहा कामात नवी उमेद घेऊनच येतो. परीक्षा काळात तर चहा घेतल्याशिवाय काही जमत नाही. कंटाळवाण्या वातावरणात चहाचा एक घोट आनंददायी आणि नवी आशा देणारा असतो.

आत्मश शेख

संकलन – सुयश देशपांडे, पराग गोगटे