नूवी दिल्लीच्या नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूटमध्ये उपलब्ध असणाऱ्या खालील पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश उपलब्ध आहेत-
० ‘थर्मल पॉवर प्लँट इंजिनीअरिंग’  पदव्युत्तर अभ्यासक्रम
अर्जदारांनी मेकॅनिकल वा इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमधील पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.
० ‘पॉवर ट्रान्समिशन अ‍ॅण्ड डिस्ट्रिब्युशन’ पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम
उमेदवारांनी इलेक्ट्रिकल, पॉवर, इलेक्ट्रिकल वा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगमधील पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
निवड पद्धती : अर्जदारांची संबंधित पात्रता, परीक्षेतील गुणांची टक्केवारी यांच्या आधारे त्यांना समूह चर्चेसाठी बोलाविण्यात येऊन त्यानुसार संबंधित अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल.
निवड झालेल्या उमेदवारांना इन्स्टिटय़ूटतर्फे वसतिगृहाची सोय उपलब्ध करून दिली जाईल.
अर्ज व माहितीपत्रक : अर्ज व माहितीपत्रक घरपोच हवे असल्यास
८०० रु.चा एनपीटीआर-बद्रपूरच्या नावे असणारा व नवी दिल्ली येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट विनंती अर्जासह इन्स्टिटय़ूटच्या कार्यालयात पाठवावा.
अधिक माहितीसाठी संपर्क : अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, नवी दिल्लीच्या http://www.npti.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : संपूर्णपणे भरलेले प्रवेशअर्ज दि प्रिन्सिपल डायरेक्टर, नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, बद्रपूर, नवी दिल्ली ११००४४ या पत्त्यावर  ८ ऑगस्ट २०१४ पर्यंत पाठवावेत.