उमेदवार बायोकेमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, फार्मास्युटिकल केमिस्ट्री यांसारख्या विषयातील एमएस्सी असावेत. त्यांना संबंधित विषयातील संशोधनपर कामाचा सात वर्षांचा अनुभव असावा. वयोमर्यादा ४५ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या
१४ ते २० नोव्हेंबर २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर ३ डिसेंबर २०१५ पर्यंत
अर्ज करावा.

हिंदुस्थान कॉपर लिमिटेडमध्ये असिस्टंट मॅनेजर- ह्य़ुमन रिसोर्सच्या ३
जागा उमेदवार एचआरमधील पदव्युधर पात्रताधारक असावेत. त्यांना संबंधित कामाचा पाच वर्षांचा अनुभव असावा.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २१ ते २७ नोव्हेंबर २०१५च्या अंकात प्रकाशित झालेली हिंदुस्थान कॉपर लिमिटेडची जाहिरात पाहावी अथवा हिंदुस्थान कॉपरच्या http://www.hindustancopper.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर ५ डिसेंबर २०१५ पर्यंत
अर्ज करावा.

पूर्व- मध्य रेल्वेमध्ये खेळाडूंसाठी १६ जागा
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील पात्रताधारक व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. वयोमर्यादा २५ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २१ ते २७ नोव्हेंबर २०१५च्या अंकातील पूर्व-मध्य रेल्वेची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज जनरल मॅनेजर (पी), रिक्रुटमेंट सेक्शन, हेडक्वार्टर ऑफिस, ईस्ट सेंट्रल रेल्वे, हाजीपूर (बिहार), ८४४१०१ या पत्त्यावर ८ डिसेंबर २०१५
पर्यंत पाठवावेत.

कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियामध्ये ऑफिस मॅनेजर- कॉर्पोरेट सव्‍‌र्हिसच्या १५ जागा
वयोमर्यादा २८ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली ‘कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया’ची जाहिरात पाहावी. अथवा कमिशनच्या ६६६.ू्रू.ॠ५.्रल्ल या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज दि डेप्युटी डायरेक्टर (एचआर डिव्हिजन), कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया, तिसरा मजला, हिंदुस्थान टाइम्स हाऊस, १८-२०, कस्तुरबा गांधी मार्ग, नवी दिल्ली- ११०००१ या पत्त्यावर
७ डिसेंबर २०१५ पर्यंत पाठवावेत.

सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स ऑफ इंडिया- हैद्राबाद येथे साहाय्यकांच्या ८ जागा
वयोमर्यादा ३५ वर्षे. अर्जाचा नमुना व अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १० ते १६ नोव्हेंबर २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स ऑफ इंडियाची जाहिरात पाहावी अथवा पार्कच्या http://www.hyd.stpi.in या संकेतस्थळाला
भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर
८ डिसेंबर २०१५ पर्यंत अर्ज करावा.

उत्तर-पश्चिम रेल्वेमध्ये खेळाडूंसाठी ८ जागा
उमेदवार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील पात्रताधारक व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. वयोमर्यादा २९ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २१ ते २७ नोव्हेंबर २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली उत्तर-पश्चिम रेल्वेची
जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज असिस्टंट पर्सोनेल ऑफिसर (रिक्रुटमेंट), रेल्वे रिक्रुटमेंट सेल, नॉर्थ वेस्टर्न रेल्वे, पॉवर हाऊस रोड, डीआरएम ऑफिस, जयपूर- ३०२००६ या पत्त्यावर ९ डिसेंबर २०१५ पर्यंत पाठवावेत.