24 October 2017

News Flash

करिअरमंत्र

सध्या नर्सिग क्षेत्रात करिअरच्या उत्तमोत्तम संधी उपलब्ध होऊ  शकतात.

सुरेश वांदिले | Updated: August 9, 2017 3:52 AM

अमेरिकेमध्ये मास्टर्स अभ्यासक्रम विविध आंतरशाखांमध्ये करता येतो.

*   मी बारावी झालो आहे. मी यापुढे बी.एस्सी नर्सिग करावे की बीएस्सी अ‍ॅग्री? कोणता अभ्यासक्रम उत्तम राहील?

– शुभम चेके

सध्या नर्सिग क्षेत्रात करिअरच्या उत्तमोत्तम संधी उपलब्ध होऊ  शकतात. मात्र अद्यापही आपल्या समाजात पुरुष नर्सेस ही संकल्पना रुळायची आहे. याकडे तितकेसे सकारात्मकरीत्या पाहिले जात नाही. त्यामुळे हा अभ्यासक्रम करायचा असल्यास ही गोष्ट जरूर लक्षात घ्यावी. बी.एस्सी कृषी अभ्यासक्रम केल्यास कृषी अधिकारी, वन अधिकारी, राज्य सेवा परीक्षेद्वारे विविध राजपत्रित अधिकारीपदांसाठी निवड होऊ  शकते. तसेच एमएस्सी व पीएच.डी. केल्यानंतर अध्यापन, संशोधन अशा विविध संधी मिळू शकतात.

*   माझा मुलगा अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षांला आहे. त्याला अमेरिकेमध्ये जाऊन मास्टर्स कोर्स करायचा आहे. सध्या तो  इलेक्ट्रॉनिक इंजिनीअरिंग करत आहे. पण त्याला मास्टर्स एआर, व्हीआरमध्ये करायचे आहे. तरी त्याने कोणता कोर्स करावा? जेणेकरून त्याला अमेरिकेत प्रवेश मिळेल? 

– श्रुतिका वर्दे

वरील प्रश्नावरून तुमच्या मुलाला आर्टिफिशिएल रिअ‍ॅलिटी किंवा व्हच्र्युअल रिअ‍ॅलिटी या विषयात पदव्युत्तर पदवी घ्यावयाची आहे असे दिसते. इलेक्ट्रॉनिक विषयात पदवी घेतल्यावर त्यास या विषयांमध्ये प्रवेश मिळू शकेल. मात्र त्यासाठी त्याला पदवीमध्ये उत्तम गुण मिळवणे आवश्यक आहेत. तसेच टोफेल (टेस्ट ऑफ इंग्लिश अ‍ॅझ फॉरेन लँग्वेज) आणि जीआरई (ग्रॅज्युएट रिकॉर्ड एक्झामिनेशन) परीक्षेतसुद्धा चांगले गुण मिळवणे आवश्यक ठरते. शिवाय विविध कलांमध्ये कौशल्य मिळाले असेल तर प्रवेशासाठी त्याचा उपयोग होऊ  शकतो. उत्तम संवाद कौशल्य हवे. अमेरिकेमध्ये मास्टर्स अभ्यासक्रम विविध आंतरशाखांमध्ये करता येतो. मात्र त्यासाठी तुम्हास त्याचा शोध घ्यावा लागेल.

First Published on August 9, 2017 3:52 am

Web Title: career experts share their best tips for success
टॅग Career Experts