’   मी २७ वर्षांचा असून खुल्या संवर्गातील आहे. मला यूपीएससी आणि एमपीएससीसाठी किती संधी आहेत?

– अक्षय चौव्हान

खुल्या संवर्गासाठी संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी वयोमर्यादा ३२ वर्षे आहे. त्यामुळे तुम्ही आणखी या परीक्षेच्या पाच संधी घेऊ  शकता. एमपीएससीसाठी वयोमर्यादा ३८ वर्षे आहे.

’   सध्या मी एमएससी भौतिकशास्त्राच्या व्दितीय वर्षांला शिकत आहे. मला फोटोनिक्समध्ये देशात आणि परदेशात कुठे आणि कुठल्या प्रकारच्या संधी उपलब्ध होतील.

– अभय कुलकर्णी

फोटोनिक्स या विषयातील पदवी/ पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांना टेलिकम्युनिकेशन कंपन्या, सेमिकंडक्टर टेक्नॉलॉजी, इंटिग्रेटेड ऑप्टिक्स, ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स यासारख्या क्षेत्रात संशोधन आणि विकास करणाऱ्या कंपन्या, ऑप्टिकल कम्पोनंट आणि कार्यप्रणाली पुरवणाऱ्या कंपन्यांमध्ये डिझाइन, निर्मिती, परीक्षण करण्यासाठी तज्ज्ञ, औद्योगिक निर्मिती क्षेत्रात कटिंग, ड्रिलिंग, वेल्डिंगतज्ज्ञ, सेमी कंडक्टर्स क्षेत्रात सर्किट लेअरची संकल्पन, ऑटोमोबाइल उद्योगामध्ये इंटिरिअर आणि ब्रेक ध्वनिपरीक्षण तज्ज्ञ म्हणून संधी मिळू शकते. पुढील काही कंपन्यांना फोटोनिक्सतज्ज्ञांची गरज भासत असते- इगल फोटोनिक्स (बंगुळुरू आणि चेन्नई), क्वालिटी फोटोनिक्स- हैदराबाद, स्टरलाइट ऑप्टिकल टेक्नॉलॉजी, ऑप्टिवेअर फोटोनिक्स लिमिटेड.