रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाने आता विभागीय ग्रामीण बँका तसेच सहकारी बॅँकांना मध्यवर्ती ‘पेमेंट सिस्टिम्स’ समाविष्ट करून घेण्याची परवानगी दिली आहे. रिझव्‍‌र्ह बँकेच्या या निर्णयामुळे आता सर्वच बँकांना ‘आरटीजीएस’ आणि ‘एनईएफटी’ या प्रणालीच्या मदतीने  इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रक्कम हस्तांतर करता येऊ  शकणार आहे.

आरटीजीएस म्हणजे काय?

DJ used for entertainment
आवाज वाढव डीजे तुला..
damage forests
उद्योगांवर कृपादृष्टी… सामान्यांवर वक्रदृष्टी!
Forest Recruitment marathi news
वनखात्यातील वनरक्षक भरतीप्रक्रिया; शारीरिक चाचणीत अव्यवस्थेचा आरोप
central government to amend consumer protection act to check the validity of eco friendly products
तुम्ही खात असलेला पदार्थ खरोखरच शाकाहारी आहे का ? केंद्र सरकार करणार कायद्यात सुधारणा
  • आरटीजीएस (रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट) ही अशी प्रणाली आहे, ज्यामध्ये एका बँकेतून दुसऱ्या बँकेत विनाविलंब रक्कम हस्तांतर करता येऊ शकते. याद्वारे २ लाख रुपये हस्तांतरित करता येऊ  शकतात.
  • एनईएफटी (नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर) च्या माध्यमातून देशातील कोणत्याही बँकेत पैसे हस्तांतर करता येतात. एका वेळी ५०,००० रुपये हस्तांतरित होतात.
  • विशेष म्हणजे तुम्ही जर नेटबँकिंग करत असाल तर बँकेत न जाता आपण आपल्या घरच्या संगणकाद्वारे आरटीजीएस ऑप्शनमध्ये जाऊन ज्या व्यक्तीला तुम्हाला रक्कम द्यावयाची आहे त्या व्यक्तीचा खाते क्रमांक द्यावा, काही बँका कोड विचारणा करतात. तेव्हा हा कोड संबंधित बँकेकडून घ्यावा किंवा भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेच्या http://www.rbi.org.in या संकेतस्थळावर आपणास संबंधित बँकेचा आयएफएस कोड मिळेल. अर्थात असे व्यवहार करताना तुम्ही बँक अधिकारी यांच्याशी चर्चा करणे आवश्यक आहे.

ग्राहकांचा फायदा

  • आरटीजीएस व्यवहार शुल्क हे ग्राहकाबरोबर असलेल्या बँकेच्या नातेसंबंधांवर अवलंबून असते.
  • हे शुल्क प्रतिव्यवहार ५० रुपयांपासून ते २०० रुपयांपर्यंत असू शकते.
  • आरटीजीएस प्रणाली पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर तुमच्या खात्यातील रक्कम शून्य दिवसात किंवा डिमांड ड्राफ्ट बँकेला सादर केल्यानंतर त्याच दिवशी तुमच्या खात्यात जातो.