भारतीय पोस्ट खात्यामध्ये एकूण १३,४६७ ग्रामीण डाक सेवकपदांची भरती.

महाराष्ट्र पोस्टल सर्कलमधील रिक्त पदे – १,७८९ (अराखीव – १,०३४, इमाव – ३७५, अजा – १२४, अज – ५६६).

पात्रता – १०वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा – १८ ते ४० वष्रे. फी रु. १००/- (महिला/अजा/अज यांना फी माफ आहे.)

अंतिम निवड – १०वीच्या गुणवत्तेनुसार. (पदांचा पसंतीक्रम एसओ निवडताना रिक्त पदांचे आरक्षण पाहून मगच द्यावा.) ऑनलाइन रजिस्ट्रेशन https://indiapost.gov.in/ किंवा https://appost.in /gdsonline या संकेतस्थळावर करावे. रजिस्ट्रेशन नंबर आणि फी पेमेंट नंबरसह ऑनलाइन अर्ज दि. ६ मे २०१७ पर्यंत करावेत. पदांची नावे जीडीएस (बीपीएम/पॅकर/एमडी)

ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लि. (ओएनजीसी) जाहिरात क्र.३/२०१७  (आर अँड पी) (जीएटीई-२०१७ च्या स्कोअरवर आधारित) इंजिनीअरिंग आणि जीओ सायन्सेसमधील ग्रॅज्युएट ट्रेनीजच्या एकूण ७२१ पदांची भरती.

पात्रता – मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, पेट्रोलियम, केमिकल, जीओफिजिक्स इ. मधील इंजिनीअरिंग पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण.

केमिस्ट – (६७ पदे).

पात्रता – एमएस्सी (केमिस्ट्री) किमान ६०%  गुण. या सर्व पदांची जीएटीई २०१७ च्या स्कोअरवर आधारित भरती.

वयोमर्यादा – २८/३० वष्रे (इमाव – ३१/३३ वष्रे, अजा/अज – ३३/३५ वष्रे).

ऑनलाइन www.ongcindia.com  या संकेतस्थळावर दि. २७ एप्रिल २०१७ पर्यंत करावेत.

बँक ऑफ बडोदामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर (ज्युनियर मॅनेजमेंट ग्रेड/स्केल-क) (४०० पदे) भरती

बरोडा मनिपाल स्कूल ऑफ बँकिंग येथे ९ महिन्यांच्या पोस्ट ग्रॅज्युएट सर्टििफकेट इन बँकिंग अँड फिनान्स कोर्ससाठी प्रवेश घ्यावा लागेल. ९ महिन्यांच्या सर्टििफकेट कोर्सनंतर उमेदवाराला प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून बँकेत नोकरी दिली जाईल. ३ महिन्यांच्या वर्क इंटिग्रेटेड लìनगसाठी बँक ऑफ बडोदाच्या एका ब्रँचमध्ये ऑन जॉब ट्रेिनग घ्यावे लागेल. ट्रेिनग पूर्ण झाल्यानंतर ‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग अँड फिनान्स’ दिला जाईल. या कोर्ससाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आणि वर्णनात्मक स्वरूपाची) मुलाखत या आधारे.

पात्रता – दि. १ मे २०१७ रोजी पदवी किमान ५५%  गुणांसह (अजा/अज/विकलांग – ५०%  गुण).

परीक्षा शुल्क – रु. ७५०/- (अजा/अज/विकलांग – रु. १००/-).

वयोमर्यादा – दि. १ एप्रिल २०१७ रोजी २० ते २८ वष्रे (इमाव -३१ वष्रे, अजा/ अज – ३३ वष्रे).

ऑनलाइन अर्ज www.bankofbaroda.co.in या संकेतस्थळावर दि. १ मे २०१७ पर्यंत करावेत. ऑनलाइन परीक्षा दि. २७ मे २०१७ रोजी.