टपाल विभाग, वरिष्ठ व्यवस्थापक यांच्या कार्यालयात कुशल कारागीर भरती.

(१)  मोटर व्हेइकल मेकॅनिक          (३ पदे – यूआर्),

(२)  मोटर व्हेइकल इलेक्ट्रिशियन   (१ पदे – अज),

(३)  वेल्डर (१ पद – इमाव),

(४)  पेंटर (१ पद – अजा).

पात्रता – इयत्ता ८ वी उत्तीर्ण.

आयटीआय प्रमाणपत्र, एक वर्षांचा संबंधित अनुभव. मेकॅनिक (एमव्ही) साठी जड वाहने चालविण्याचा परवाना आवश्यक.

वयोमर्यादा – १ जुलै २०१७ रोजी १८ ते ३० वर्षे. केंद्रीय कर्मचारी अजा/अज करिता ३५ वर्षे, इमाव – ३३ वर्षे.

निवड पद्धती – पात्र उमेदवारांना अभ्यासक्रमासह चाचणीचा दिनांक आणि ठिकाण वेगळे कळविण्यात येईल. सविस्तर जाहिरात ‘लोकसत्ता’च्या दि. ११ जुलै २०१७ च्या अंकात पाहावी.

बायोडेटामध्ये पुढील माहितीसह अर्ज सादर करावा. (१) पूर्ण नाव (ब्लॉक लेटर्समध्ये), (२) वडिलांचे नाव (ब्लॉक लेटर्समध्ये), (३) नागरिकत्व, (४) कोणत्या पदासाठी अर्ज केला आहे, (५) कायमचा पत्ता,

(६) पत्रव्यवहारासाठीचा पत्ता,

(७) जन्माचा दिनांक, (८) दि. १ जुलै २०१७ रोजी वय … वर्षे, … महिने, … दिवस, (९) जात, (१०) शैक्षणिक पात्रता, (११) तांत्रिक पात्रता, (१२) तांत्रिक अनुभव, (१३) चालक परवाना

(केवळ एमव्ही मेकॅनिकसाठी),

(१४) संबंधित अन्य कोणतीही माहिती.

उमेदवाराने अर्जावर सही केलेली असावी व दोन पासपोर्ट साइज फोटो राजपत्रित अधिकाऱ्याने साक्षांकित केलेले. एक अर्जावर चिकटवलेले व एक अर्जासोबत जोडलेले असावे.

अर्जासोबत राजपत्रित अधिकाऱ्याने साक्षांकित केलेल्या पुढील कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.

शैक्षणिक पात्रता, तांत्रिक पात्रता, वयाचा दाखला, अजा/अज/इमाव जातीचा दाखला, चालक परवाना, तांत्रिक अनुभव, नागरिकत्व/अधिवास प्रमाणपत्र. अर्ज केलेल्या पदाचे नाव पाकीट व अर्जावर ठळकपणे नमूद करावे. अर्जावरील पत्त्यावर दि. २८ ऑगस्ट २०१७ पर्यंत पोहोचतील असे केवळ स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर्ड पोस्टाद्वारेच पाठवावेत.