हे फळ देखणं तर आहेच शिवाय त्यात जीवनसत्त्व सी आणि के, पोटॅशियम, मॅग्नेशियम असल्यामुळे, हाडांचं आरोग्य सांभाळतं, सूज कमी करतं. शरीरातला मेद कमी करण्यासाठी आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी स्ट्रॉबेरीचा उपयोग होऊ  शकतो. कर्करोगाच्या पेशीशी मुकाबला करण्याचा गुणधर्म स्ट्रॉबेरीत आहे. ताज्या स्ट्रॉबेरी फार काळ टिकत नाहीत पण स्ट्रॉबेरी क्रश, जॅम बाजारात उपलब्ध असतो त्यांचा उपयोग आइस्क्रीम, शेक आणि इतर पदार्थ करण्यासाठी होऊ  शकतो. चॉकलेट वितळवून त्यात बुडवून काढलेल्या स्ट्रॉबेरीज छान लागतात.
स्ट्रॉबेरी कूल
साहित्य : ३०० ग्रॅम स्ट्रॉबेरी, एक कप क्रीम, एक चमचा जिलेटिन पावडर, एक मोठा चमचा पाणी, १/२ वाटी साखर.
कृती : पाणी कोमट करून त्यात जिलेटिन विरघळवावं. नंतर स्ट्रॉबेरीचे काप, क्रीम, जिलेटिन, साखर एकत्र करून मिक्सरमधून काढावं आणि फ्रिजरमध्ये थंड करावं.
स्ट्रॉबेरी सॉस
साहित्य : दोन वाटय़ा स्ट्रॉबेरीचे काप, एक चमचा चिंचेचा कोळ, एक मोठा चमचा साखर, पाव चमचा जिरेपूड, प्रत्येकी चिमूटभर लवंग आणि दालचिनी पावडर, चवीला मीठ, तिखट
कृती : सर्व जिन्नस एकत्र करून मिक्सरमध्ये पेस्ट करावी आणि एक उकळी द्यावी.
 वसुंधरा पर्वतेvgparvate@yahoo.com