भाकरीबरोबर जवस किंवा अळशीची चटणी हा मेनू खास ग्रामीण असला तरी जवसाचं महत्त्व आता सगळ्यांना कळायला लागलं आहे. हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेलं ओमेगा-३ जवसात आहे, म्हणूनच जवस किंवा अळशीच्या नित्य सेवनाने रक्तातील साखर, ट्रायग्लिसराईड्स, हिमोग्लोबिन आणि कोलेस्टेरॉल आटोक्यात राहू शकतात. स्त्रियांच्या बाबतीत हॉर्मोन्सची पातळी योग्य ठेवण्यासाठी जवसाचा उपयोग होतो. जवस भाजून त्याची पूड पाण्यात टाकून उकळून केलेला काढा, कफ पातळ करायला आणि बद्धकोष्ठासाठी उपयोगी पडतो. जवसाचं पीठ आपण धिरडी, थालिपीठ, डोशाच्या पिठातही घालू शकतो. एक चमचा जवसाचं पीठ १ कप कणकेत घालून पोळ्या कराव्या.
जवसाची चिक्की
साहित्य : १ वाटी जवस, पाव वाटी तीळ, पाव वाटी किसलेलं सुकं खोबरं, एक मोठा चमचा डिंकाचे बारीक खडे, पाऊण वाटी बारीक चिरलेला गूळ (शक्यतो चिकीचा), एक मोठा चमचा पिठीसाखर, एक चमचा तूप.
कृती : जवस, तीळ, खोबरं वेगवेगळं खमंग भाजून घ्यावं. डिंक तळून घ्यावा किंवा मायक्रोवेव्हमध्ये ठेवून फुलवून घ्यावा. कढई गरम करून त्यात तूप घालावं, गूळ आणि साखर घालून ढवळत राहावं, गुळाच्या पाकाचा थेंब पाण्यात टाकून तो गार झाला आणि त्याचा कटकन तुकडा मोडता आला की पाक झाला. मग पाकात जवस, तीळ, खोबरं, डिंक घालून, ढवळून तूप लावलेल्या थाळीत थापावं आणि लगेच वडय़ा पाडाव्या.
वसुंधरा पर्वते -vgparvate@yahoo.com

children holidays, holidays, Parents worry,
सांदीत सापडलेले : सुट्टी!
loksatta readers opinion on editorial readers reaction on loksatta news
लोकमानस : शेवटी आर्थिक फटका शेतकऱ्यांनाच!
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !