‘गर्भसंस्कारांचा अंधश्रद्ध सापळा’ असा लेख छापून आलेला आहे. लेख वाचल्यानंतर असे लक्षात येते की, डॉ. संकलेचा व डॉ. गद्रे या दोन डॉक्टरांना अलीकडे झालेल्या संशोधनाचा गंध नाही. त्यामुळे त्यांच्या लेखातील अनेक विधाने अशास्त्रीय आणि अभ्यास न करता मांडलेली आहेत. पण लोकांच्या दृष्टीने एम.डी. स्त्रीरोगतज्ज्ञ अशी विधाने करत असल्यामुळे सर्वसामान्य लोकांचा गोंधळ उडाला तर नवल नाही.
मन:शक्ती प्रयोग केंद्र ही स्वामी विज्ञानानंदांनी स्थापन केलेली संस्था गेली ६० वर्षे त्यांच्या साधकांमार्फत समाजामध्ये गर्भसंस्कारांचे काम करीत आहे. मन:शक्तीमधील गर्भसंस्कार या संकल्पनेचा उद्देश केवळ त्या कुटुंबाला सुसंस्कारित अपत्य लाभ होणे एवढाच नसून गर्भसंस्कारांमुळे समाजामधल्या तीनही पिढय़ांत सकारात्मक बदल होणे हा आहे.
या लेखात गर्भसंस्कारांबद्दल २ प्रश्न निर्माण केले आहेत. एक म्हणजे ‘गर्भसंस्कार’ नावाखाली चालू असलेल्या बाजाराबद्दल आणि दुसरा मुळात ‘गर्भसंस्कार’ या संकल्पनेबद्दल. संस्कार हे विकले जाऊ शकत नाहीत. संस्कार हे कृतज्ञता आणि त्याग या सूत्रांवरच आधारलेले आहेत. त्यामुळे त्याचा त्या नावाखाली व्यवसाय करणे चुकीचे आहे. हे थांबवले गेले पाहिजे.
मात्र त्यांनी मूळ ‘गर्भसंस्कार’ या संकल्पनेलाच विरोध केलेला आहे व तो चुकीचा आहे, अयोग्य आहे आणि अशास्त्रीय आहे. पोटामधल्या बाळाला गर्भधारणेच्या क्षणापासून कळत असते. याबद्दल शास्त्रज्ञांमध्ये आता दुमत राहिलेले नाही. या दोन डॉक्टरांच्या माहितीकरिता पुढील संदर्भ देतो.
१) मॉडर्न जेनिटिक्सचे पितामह म्हणून ज्यांचे स्थान आहे त्यांचे नाव आहे डॉ. जेरोम लेज्यून. त्यांनी म्हटलेले आहे, ”Life is present from the moment of conception” before the Louisiana Legislature’s House Committee on the Administration of Criminal Justice on June 7, 1990.
He explained that within three to seven days after fertilization we can determine if the new human being is boy or girl. ”At no time”, Dr. Lejeune said, ”Is the human being a blob of protoplasm. As far as your nature is concerned, I see no difference between the early person that you were at conception and the late person which you are now. You were, and are, a human being..” याचा अर्थ गर्भधारणा झालेल्या पेशी (झायगोट)मध्येसुद्धा जाणीव असते. सुरुवातीची
ही पेशी म्हणजेच आजचे तुम्ही आहात, यात काहीच फरक नाही.
२) दुसरा संदर्भ अॅम्नियोसिंटेसिसचा आहे. म्हणजे गर्भजल परीक्षेचा आहे. साधारणपणे १६ ते २० व्या आठवडय़ामध्ये गर्भाशयामध्ये सुई टोचून गर्भजल काढले जाते व त्याची जेनिटिक्स डिफेक्टस्करिता तपासणी केली जाते. या प्रक्रियेत त्यांना असे आढळून आले की, सुई टोचल्यानंतर गर्भाची प्रचंड हालचाल होते, तो अस्वस्थ होतो. काही वेळेला तो घाबरून पळतो, तर काही वेळेला त्याने सुईवरती हल्ला केल्याचीही निरीक्षणे नोंदलेली आहेत. आता प्रश्न असा निर्माण होतो की, गर्भाला जर काहीच कळत नाही आणि विशेषत: १६ व्या आठवडय़ासारख्या सुरुवातीच्या काळात, तर मग आपल्या जिवाला धोका आहे हे ज्ञान त्याला कुठून येते?
संदर्भ : Pre-parenting – Nurturing your child from conception. by – Dr. Thomas Verny. M.D. and Pamela Weintraub. SIMON and SCHUSTER – NY 10020.
३) तिसरे उदाहरण स्वप्नांबद्दलचे आहे. या दोन डॉक्टरांच्या माहितीकरिता लिहितो की, गर्भालासुद्धा स्वप्ने पडतात. आणि ती अन्य माणसांपेक्षा जास्त पडतात असे संशोधन सांगते. विशेषत: सातव्या महिन्यामध्ये तर REM sleep, non REM sleep यांची आवर्तने चालू असतात. स्वप्न पडल्यामुळे त्यांची शारीरिक हालचाल होते, त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात. आता प्रश्न असा आहे की, जर त्यांना कळतच नसेल तर त्यांना स्वप्न का पडतात? ते स्वप्नात का हसतात? का रडतात? अलीकडचे संशोधन असे सांगते की, त्यांना अनुभव आणि विचार केल्याशिवाय स्वप्ने पडू शकत नाहीत. म्हणजे गर्भावस्थेतील मुलांना वातावरणाचा अनुभव येत असतो. आपण त्यांची विचारप्रक्रियाही सुरू झालेली असते.संदर्भ – वरील ग्रंथ – पान ३० वरील तीनही उदाहरणांचा निष्कर्ष असा की, गर्भात असताना त्याला कळत असते, तो विचार करीत असतो व शिकतही असतो.
डॉक्टरांच्या लेखामधले आणखी एक महत्त्वाचे पण चुकीचे व अशास्त्रीय विधान म्हणजे आईची मन:स्थिती, भावना यांचा गर्भावर परिणाम होत नाही असे आहे. आज या विषयावर शेकडो रिसर्च पेपर्स प्रसिद्ध झालेले आहेत आणि त्यातून सिद्ध झाले आहे की, गर्भवती मातेच्या भावनांचा खोलवर परिणाम मुलाच्या व्यक्तिमत्त्वावर / स्वभावावर होत असतो. आईच्या मनामध्ये जास्त भीती असेल किंवा ती भित्र्या स्वभावाची असेल तर बाळाच्या वाढीवर परिणाम होतो. कमी वजनाची बाळे जन्माला येतात. आईला जर नैराश्याचा त्रास जास्त प्रमाणात झाला तर मुलांमध्ये हायपर अॅक्टिव्हिटी वाढते, चंचल होतात.
याशिवाय या दोघा डॉक्टरांनी कॅलिफोर्निया येथील ‘Associations for pre and perinatal psychology of Health’ या आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थेची माहिती जरूर घ्यावी. या संस्थेचे संस्थापक डॉ. वेर्नी यांनी १९८३ साली ‘The Secret Life of Unborn Baby’ हे पुस्तक लिहिले व ते त्यातल्या संशोधनामुळे प्रचंड गाजले, त्याचे २७ आंतरराष्ट्रीय भाषांत
भाषांतर झाले आहे. या सर्व विषयांवर मन:शक्तीने संशोधन व अभ्यास केले.
थोडक्यात निष्कर्ष असा की, गर्भसंस्कार हा कुठल्याही तऱ्हेचा अंधश्रद्ध सापळा नसून ती एक सश्रद्ध, शास्त्रीय, समाजनिर्मितीची प्रक्रिया आहे.
– ग. श्री. केळकर, एम.टेक् , संशोधन प्रमुख व ट्रस्टी
मन:शक्ती ट्रस्टस्, लोणावळा. – kelkar@mac.com

indian Institute of technology students package drastically reduced due to global economic slowdown
गलेलठ्ठ वेतनाच्या ‘आयआयटी’च्या ऐटीला तडा
Loksatta kutuhal Endowment of Suryaji Pisala Artificial intelligence
कुतूहल: सूर्याजी पिसाळांचा बंदोबस्त
Sexual abuse of young woman by pretending treatment case filed against self-proclaimed doctor in Nalasopara
उपचाराच्या नावाखाली तरुणीवर लैंगिक अत्याचार, नालासोपार्‍यात स्वयंघोषित वैद्याविरोधात गुन्हा दाखल
Loksatta vasturang Lessons from redevelopment buildings Layout of flats
पुनर्विकासाचे धडे : कौटुंबिक अवकाश जपू या!