० अचानक सूप करायचे झाले आणि ताजे क्रीम नसल्यास लोणी आणि दूध यांचे मिश्रण करून सूपमध्ये टाकावे.
० डोसा करण्यापूर्वी पिठात दोन चमचे भात टाकून मिश्रण एकजीव करून घ्या व मग डोसे करा. डोसे तव्याला चिकटत नाहीत आणि कुरकुरीत होतात.
० प्लास्टिकच्या डब्याला किंवा काचेच्या भांडय़ाला कुबट, खवट किंवा आधी ठेवलेल्या खाद्यपदार्थाचा वास येत असेल तर भांडय़ाला िलबाची साल चोळून ठेवावी व पाच मिनिटाने धुऊन घ्यावे. वास निघून जातो.
० चेहरा पाण्याने ओला करून घ्यावा, हातावर सुके मीठ घेऊन चेहऱ्यावर, नाकावर हलक्या हाताने चोळावे. ब्लॅकहेड्स निघून जातात व चेहराही मऊ-चमकदार दिसतो.
० नवीन आणलेल्या भांडय़ांना कंपनीचा किंवा किमतीचा स्टिकर लावलेला असतो तो काढण्यासाठी स्टिकर लावलेल्या भागाच्या आतील किंवा विरुद्ध बाजू गॅसवर गरम करावी. हळूहळू स्टिकर भांडय़ापासून वेगळा होईल तेव्हा अलगद स्टिकरचे टोक पकडून सुरीने सरकवत सरकवत काढावा.
० नेल पॉलिश काढण्यासाठी रिमूव्हर नसल्यास परफ्युम मारून नेल पॉलिश काढता येते.
० द्राक्षाच्या घडापासून द्राक्ष काढायची असल्यास, दांडा पकडून घड हातात धरावा व दुसऱ्या हातात जेवणाचा काटा घेऊन द्राक्षाचा देठ काटय़ाच्या खाचेत घालून काटा द्राक्षाबरोबर खाली खेचावा. द्राक्ष अलगद निघून येतात.
० िलबांचे २-३ थेंब हवे असतील तर िलबाला वरच्या बाजूने एक छिद्र करावे. त्यातून आपल्याला हवे असतील तितके थेंब घेऊन सेलोटेपने छिद्र बंद करून िलबू फ्रिजमध्ये ठेवावे. हवे तेव्हा पुन्हा वापरता येते.
० तोंड आले असल्यास कच्च्या दुधाने दिवसातून ३-४ वेळा चांगल्या खळाळून गुळण्या कराव्या आराम मिळतो.
संकलन- उषा वसंत – unangare@gmail.com