थंडीच्या दिवसांत जरा जड पदार्थ खाल्ले तरी पचतात म्हणूनच थंडीत डिंकाचे लाडू, उडदाचे पदार्थ तसेच शरीराला उष्णता देणारी बाजरी खाल्ली जाते. असेच पौष्टिक, भूक भागवणारे, शरीर बलवान करणारे पदार्थ बघूयात.

बाजरीचे वडे

How Sugar Effects On body can digestive cookie make you fat
बिस्किटाच्या पुड्यात किती साखर असते? क्रीम, गोडाची व चटपटीत बिस्किटांची निवड करताना काय बघावं?
Animals, birds, heat stroke, Mumbai metropolis,
मुंबई महानगरात प्राणीपक्ष्यांना उष्मघाताचा त्रास, दिवसाला शंभरच्या आसपास पक्षीप्राणी जखमी
best ways to kill and repel ants naturally know how to get rid of ants in the kitchen without toxic chemicals
घरात लागल्या मुंग्यांच्या रांगाच रांगा? मग केमिकल नाही तर वापरा किचनमधील ‘हे’ तीन पदार्थ? मुंग्या जातील पळून
jaljeera powder
उन्हाळ्यात प्या थंडगार जलजीरा! घरीच बनवा ३ महिने टिकेल अशी जलजीरा पावडर, नोट करा रेसिपी

बाजरीचे पीठ दोन वाटय़ा, भिजवलेली उडीद डाळ अर्धी वाटी, जिरे दोन टी स्पून, हिरव्या मिरच्या पाच ते सहा, लसूण पाकळ्या सात ते आठ पाकळ्या, चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी, हिंग व हळद प्रत्येकी अर्धी वाटी, ओवा एक टी. स्पून, मीठ चवीनुसार, तेल गरजेनुसार.

उडीद डाळ वाटून घ्या. जिरे, लसूण, हिरव्या मिरच्या  वाटून घ्या. बाजरीच्या पिठात हे सर्व घाला. हिंग, हळद, ओवा, कढीपत्ता घाला. गरम तेलाचे मोहन चार टी स्पून घाला. पीठ मळून घ्या. नंतर या मिश्रणाचे पुरीच्या  आकाराचे वडे थापून तेलात तळून घ्या. वरून तीळ लावल्यास छान दिसतील. हे वडे दही किंवा कुठल्याही  चटणी बरोबर सव्‍‌र्ह करा.

*     बाजरीमुळे शरीराला उष्णता मिळते तसेच उडदाची डाळ बलवर्धक असल्यामुळे थंडीच्या दिवसात उडदाचे पदार्थ  छान पचतात.

*     हे वडे छान टेस्टी होतात. नाष्टय़ाला करायला चांगले आहेत.

खजूर खारकेच्या वडय़ा

खजूर एक वाटी, खारकेची पावडर अर्धी वाटी, डिंक अर्धी वाटी, काजू, बदाम, पिस्ते अर्धी वाटी, साजूक तूप अर्धी वाटी.

काजू, बदाम, पिस्त्याची जाडसर पावडर करून घ्या. खजुराच्या बिया काढा. तुपात डिंक तळून घ्या. त्याच तुपात खजूर कोमट परतून घ्या. गार झाल्यावर वाटून घ्या त्यात डिंकाचा चुरा करून घाला. खारकेची पावडर तुपात परतून घ्या. ड्रायफ्रुटस्चा चुरा घाला. चांगले एकजीव करून घ्या, नंतर या मिश्रणाची जाडसर पोळी लाटून त्याच्या आवडीच्या आकाराच्या वडय़ा कापा.

बाजरीचा व्हेजिटेबल खिचडा

बाजरीचा रवा एक वाटी, मुगाची डाळ अर्धी वाटी, चिरलेले गाजर, हिरवी मिरची पेस्ट दोन टी स्पून, कोबी, फ्लॉवर, कांदा प्रत्येकी अर्धी वाटी, मटार अर्धी वाटी, आलं-लसूण पेस्ट एक टी-स्पून, तेल चार टी. स्पून, साजूक तूप चार टी. स्पून, जिरे, मोहरी, हिंग, हळद फोडणीसाठी, कढीपत्ता, मीठ चवीनुसार.

कुकरमध्ये तेल, साजूक तूप तापवा. त्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता, कांदा घालून परतून घ्या. त्यात आलं, लसूण, मिरची पेस्ट घाला. परतून त्यात हिंग, हळद घाला. बाजरीचा रवा, मुगाची डाळ घालून परता. भाज्या घाला. तीन वाटय़ा गरम पाणी घाला. मीठ, साजूक तूप, दोन टी स्पून घाला. कुकरला झाकण लावून तीन शिट्टय़ा घ्या.

सर्व्हिंग बाऊलमध्ये काढून कोथिंबीर घालून सव्‍‌र्ह करा.

*     हा खिचडा पातळसर (पळीवाढ) असा करा. गरम गरम खायला खूप छान लागतो. पौष्टिक आहे.

*     ‘वन डिश मील’ असा हा पदार्थ आहे.

 वेगळ्या पद्धतीचे डिंकाचे लाडू

डिंक दोन वाटय़ा, खारकेची पावडर दोन वाटय़ा, सुक्या खोबऱ्याचा किस दोन वाटय़ा, पिठी साखर दीड वाटी, काजू, बदाम, पिस्त्याची पावडर एक वाटी, जायपत्रीची पावडर एक टी स्पून, वेलची पावडर एक टी स्पून, साजूक तूप गरजेनुसार.

डिंक उन्हात वाळवून त्याची पावडर करून घ्या. खोबऱ्याचा किस, डिंकाची पावडर, खारिक पावडर, काजू, बदाम, पिस्त्याची पावडर, जायपत्री व वेलची पावडर सर्व एकत्र करा. त्यात पिठी साखर घाला. साजूक तूप पातळ  करून या मिश्रणात घाला. छान एकजीव करून घ्या. लाडू वळा.

*     हे लाडू बिनपाकाचे असल्यामुळे चांगले टिकतात. तसेच चवीला खूप छान लागतात.

*     डिंकातून चांगले कॅल्शिअम मिळते.

*     थंडीच्या दिवसांत खायला तसेच बाळंतीणबाईसाठी स्पेशल केले जातात.

मेथी, मुगाचे लाडू

मेथी दाणे अर्धी वाटी,  मुगाची डाळ दोन वाटय़ा, डिंक अर्धी वाटी, पिठी साखर तीन वाटय़ा, साजूक तूप दीड वाटी, जायफळ वेलची पावडर प्रत्येकी दीड टी. स्पून, काजू, बदामाची पावडर अर्धी वाटी.

मेथी दाणे लालसर खमंग भाजून घ्या. मुगाची डाळ भाजून घ्या. दोन्ही एकत्र करून दळून आणा. कढईत तूप तापवा. त्यात डिंक तळून काढून ठेवा. नंतर त्याच तुपात तयार पीठ घालून भाजा. काजू, बदामाची पावडर घाला. मिश्रण कोमट झाल्यावर त्यात जायफळ, वेलची पावडर, डिंकाचा चुरा, पिठीसाखर घालून छान एकजीव करा. छोटे छोटे लाडू बांधा.

*     या लाडूमधून कॅल्शियम चांगले मिळते. तसेच ज्यांना  संधीवात आहे त्यांच्यासाठी खूप चांगले आहेत.

*     छोटे लाडू असले म्हणजे एका वेळेस एक लाडू खाता येतो. सोबत एक ग्लास दूध पिल्यास पौष्टिक नाष्टा होतो.
मंजिरी कापडेकर – response.lokprabha@expressindia.com