पाकिस्तानने कराचीतील मलिर जिल्हा कारागृहात खितपत पडलेल्या ४० भारतीय कैद्यांची शुक्रवारी सुटका केली असून त्यामध्ये काही मच्छीमारांचा समावेश आहे.
नेपाळमध्ये भरलेल्या १८ व्या सार्क परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी हस्तांदोलन केल्यानंतर भारतीय कैद्यांची पाकिस्तानातील कारागृहातून सुटका करण्यात आल्याने त्याला महत्त्व दिले जात आहे.
सुटका करण्यात आलेल्या भारतीय कैद्यांमध्ये ३५ मच्छीमार आणि अन्य पाच जणांचा समावेश आहे, असे इधी प्रतिष्ठान धर्मादायचे प्रवक्ते अन्वर काझमी यांनी सांगितले. सदर कैद्यांना वाघा सीमेवर घेऊन जाण्यासाठी आमच्या संघटनेतर्फे वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येत आहे. या कैद्यांच्या कुटुंबीयांसाठी कपडे आणि प्रत्येकी १० हजार रुपये रोख देण्यात आले आहेत, असे काझमी यांनी सांगितले.
या कैद्यांना लाहोर येथे नेण्यात येणार असून तेथून वाघा सीमेवर भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले जाणार आहे. मच्छीमारांना कधी अटक करण्यात आली होती ते त्वरित कळू शकले नाही. मात्र एक वर्षांपूर्वी अटक करण्यात आल्याचे एका दूरचित्रवाणी वाहिनीने म्हटले आहे.
या सुटकेबाबत सरकारच्या वतीने कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही. मात्र मानवतेच्या दृष्टिकोनातून सदिच्छेने भारतीय कैद्यांना सोडण्यात येणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. नवाझ शरीफ भारतभेटीवर आले होते तेव्हा आम्ही १५१ कैद्यांना सोडले होते. आता भारताने पाकिस्तानच्या कैद्यांना सोडावे, अशी इच्छा अधिकाऱ्याने व्यक्त केली. पीटीआय, कराची
पाकिस्तानने कराचीतील मलिर जिल्हा कारागृहात खितपत पडलेल्या ४० भारतीय कैद्यांची शुक्रवारी सुटका केली असून त्यामध्ये काही मच्छीमारांचा समावेश आहे.
नेपाळमध्ये भरलेल्या १८ व्या सार्क परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी हस्तांदोलन केल्यानंतर भारतीय कैद्यांची पाकिस्तानातील कारागृहातून सुटका करण्यात आल्याने त्याला महत्त्व दिले जात आहे.
सुटका करण्यात आलेल्या भारतीय कैद्यांमध्ये ३५ मच्छीमार आणि अन्य पाच जणांचा समावेश आहे, असे इधी प्रतिष्ठान धर्मादायचे प्रवक्ते अन्वर काझमी यांनी सांगितले. सदर कैद्यांना वाघा सीमेवर घेऊन जाण्यासाठी आमच्या संघटनेतर्फे वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येत आहे. या कैद्यांच्या कुटुंबीयांसाठी कपडे आणि प्रत्येकी १० हजार रुपये रोख देण्यात आले आहेत, असे काझमी यांनी सांगितले.
या कैद्यांना लाहोर येथे नेण्यात येणार असून तेथून वाघा सीमेवर भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले जाणार आहे. मच्छीमारांना कधी अटक करण्यात आली होती ते त्वरित कळू शकले नाही. मात्र एक वर्षांपूर्वी अटक करण्यात आल्याचे एका दूरचित्रवाणी वाहिनीने म्हटले आहे.
या सुटकेबाबत सरकारच्या वतीने कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही. मात्र मानवतेच्या दृष्टिकोनातून सदिच्छेने भारतीय कैद्यांना सोडण्यात येणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. नवाझ शरीफ भारतभेटीवर आले होते तेव्हा आम्ही १५१ कैद्यांना सोडले होते. आता भारताने पाकिस्तानच्या कैद्यांना सोडावे, अशी इच्छा अधिकाऱ्याने व्यक्त केली.