मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यास चिरडणारा ट्रक जमावाने पेटवला
- वाढत्या औद्योगिकीकरणामुळे प्रदूषण नियंत्रणाचा बोजवारा
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
गुजरातच्या भूमीत जन्माला आलेले महात्मा गांधी हे माझे राजकारणातील आदर्श आहेत, असं अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी आज (मंगळवार) जामनगर येथे निवडणूक प्रचार मेळाव्यात बोलले.
राहुल गांधी म्हणाले, ते जेव्हा राजकारणाचा विचार करतात तेव्हा सर्वप्रथम गांधीजींचा विचार त्यांच्या मनात येतो आणि गांधीजींची सर्व शक्ती आपल्यासोबत असल्यासारखे वाटते.
अनेकांना वाटते गांधीजींचे विचार हे कालबाह्य झाले आहेत. पण मी त्यांना माझा गुरू मानतो. काहीवेळेस आपल्याला तत्वांसाठी कायद्याची अंमलबजावणी करावी लागते, असंही राहुल गांधी पुढे म्हणाले.
गांधी म्हणाले, आपण लोकांची मतं ऐकली पाहिजेत. यूपीए सरकारकडे आणि त्यांच्या योजनांकडे पाहिलात तर तुमच्या हे लक्षात येईल, मला त्यापैकी एखादी तरी अशी गोष्ट सांगा जिथे लोकांच्या मतांना किंमत नाही.
आपल्या बालपणीच्या राजकीय आठवणींबद्दल सांगताना राहुल गांधी यांनी जवाहरलाल नेहरू कारागृहात असतानाचा प्रसंग सांगितला. कशाप्रकारे गांधीजी नेहरूंसोबत जमिनीवर झोपले होते.
गांधीजी आज असले असते तर त्यांनी लोकांना त्यांच्या हक्कांसाठी भांडण्याकरीता उपदेश केला असता.
कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग गुजरात राज्याच्या विविध भागात प्रचारात गुंतले आहेत.



















देखल्या देवा दंडवत! युपी मध्ये/बिहारमध्ये काँग्रेसचा प्रचार करतांना गांधींजीचे नाव सुद्धा उच्चारले नाही.काँग्रेसलाच फक्त वाटते गांधीजींचे विचार हे कालबाह्य झाले आहेत.सत्य अहिंसा काँग्रेस पक्षाला राहु-केतुसारखे वाटतात.म्हणे गांधीजी गुरु आहेत.राहुल गांधी याचे गुरु दिग्गिबाबा आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे ते अयशस्वी झाले आहेत हे सर्व भारतीयांना माहिती आहे.