अमेरिकी लेखक व ब्लॉगर अविजित रॉय यांचा बांगला देशात खून केल्याची घटना क्रूरपणाची व भ्याडपणाची आहे असे अमेरिकेने म्हटले आहे.
अविजित रॉय यांच्या खुनाचा अमेरिका तीव्र शब्दात निषेध करीत आहे, अतिशय क्रूरपणे त्यांना मारण्यात आले असे परराष्ट्र प्रवक्तया जेन साकी यांनी म्हटले आहे.
अविजित हे पत्रकार होते व मानवतावादी होते, त्यांच्या कुटुंबीयांप्रती आम्ही सहानुभूती व्यक्त करतो. हा केवळ व्यक्तीवरता हल्ला नसून बांगला देशच्या घटनात्मक तत्त्वांवरील हल्ला आहे, देशाच्या बौद्धिक व धार्मिक परंपरेला छेद देणारी ही घटना आहे, असे त्या म्हणाल्या. हिंदू अमेरिकन फाउंडेशनने या घटनेचा निषेध केला आहे. अटलांटा येथील बांगला देशी-अमेरिकी लेखक व ब्लॉगर अविजित रॉय हे धार्मिक मूलतत्त्ववादावर टीका करीत होते.
मानवी हक्क संचालक  समीर कालरा यांनी म्हटले आहे, की या घटनेची वेगाने चौक शी करून दोषी व्यक्तींना शिक्षा करावी. अविजित रॉय व रफिदा यांच्यावरील हल्ला म्हणजे बांगला देशातील इस्लामी गटांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आणण्याचा केलेला प्रयत्न आहे. जेल व अन्सार बांगला ७ या संस्था तेथे लोकशाहीला धोकादायक आहेत असे त्यांनी म्हटले आहे.