देशातील वादग्रस्त विषयांचे तज्ज्ञ वकील म्हणून राम जेठमलानी यांची ओळख आहे. देशातील अनेक वादग्रस्त विषय त्यांनी हाताळले आहेत व अजूनही न्यायालयात आपल्या हायप्रोफाईल पक्षकाराची बाजू मांडताना दिसतात. जेठमलानी यांनी वयाची नव्वदी पार केली असून अजूनही ते पूर्वीइतकेच सक्रिय आहेत. नुकताच एका प्रकरणाच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात गेले असता सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांनी त्यांना निवृत्तीबाबत विचारले असता त्यावर जेठमलानी यांनी, महोदय, माझ्या मृत्यूची तारीख तुम्ही का विचारताय असा उलट सवाल त्यांनी या वेळी केला.
जेठमलानी पेश्कीाने ल असलेल्या एम. एम. कश्यप यांची एका प्रकरणात बाजू मांडण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात गेले होते. २००६ साली फसवणूकप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंद झालेला आहे. या खटल्याची सुनावणी करण्यासाठी ते न्यायालयात गेले होते. त्यावेळी सरन्यायाधीश कश्यप हे सुरूवातीलाच जेठमलानी यांच्याकडे पाहत म्हणाले, तुम्ही निवृत्त कधी होताय?, एका क्षणाचाही विलंब न लावता ते म्हणाले, महोदय, माझ्या मृत्यूची तारीख तुम्ही का विचारताय? त्यांच्या या उत्तरानंतर मात्र कुणीच काही बोलले नाही. न्यायमुर्तींनी लगेचच पुढील कामकाजास सुरूवात केली.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Aug 2016 रोजी प्रकाशित
सरन्यायाधीशांनी जेठमलानींना विचारले, निवृत्त कधी होणार ?
एका क्षणाचाही विलंब न लावता ते म्हणाले, महोदय, माझ्या मृत्यूची तारीख तुम्ही का विचारताय?
Written by लोकसत्ता टीम

First published on: 23-08-2016 at 19:15 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cji ts thakur asks ram jethmalani when are you going to retire