बाजारात खरेदीसाठी आलेल्या येथील ‘डीआरडीओ’च्या विभागीय कार्यालयाच्या संचालकांवर येथे हल्ला झाला. एका अल्पवयीन पाकीटमार मुलाने हा हल्ला केल्याचे म्हटले जात आहे. मात्र, या हल्ल्याचा संस्थेच्या नियमित कामांशी संबंध नसल्याचा निर्वाळा डीआरडीओने दिला.
कोरापूत येथील डीआरडीओ कार्यालयाचे प्रादेशिक संचालक आर. के. सत्पथी चारमिनार परिसरात खरेदीसाठी आले असताना त्यांच्यावर धारदार ब्लेडने वार करण्यात आले. जखमी त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.