labour-day-doodle-759इंटरनेटच्या महाजालातील लोकप्रीय सर्च इंजिन असलेल्या गुगलने कामगार दिनानिमित्त जगातील कामगारांना समर्पित खास डुडल तयार केले आहे.
अवजारांचा आधार घेत गुगलने आपल्या होमपेजवर गुगल हे अक्षर तयार केले आहे. यामध्ये पक्कड, हातमोजे, टेप रोल्स, पाना आणि मोजपट्टी यांचा वापर करण्यात आला आहे. या खास डुडलच्या माध्यमातून जगातील कामगारांनी दिलेल्या योगदानाचा सन्मान गुगलने केला आहे.