राणसीला “स्मार्ट सिटी‘ बनविण्याच्या दिशेने आज पहिले पाऊल टाकण्यात आले. जपानमधील “स्मार्ट सिटी‘ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्‍योटोच्या धर्तीवर वाराणसीचा विकास करण्याच्या करारावर शनिवारी भारत आणि जपानने स्वाक्ष-या केल्या.
या करारामध्ये काशीला स्मार्ट सिटी म्हणून विकसित करण्यात येणार आहे. उभय दोशांमधील करारा दरम्यान मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो एबे हेदेखील उपस्थित होते. शिंजो खास मोदींनी भेटण्यासाठी टोक्योहून आले होते. या करारानुसार आता वाराणसीचा विकास क्योटो शहराच्या मॉडेलनुसार करण्यात येईल. क्योटोमधल्या ऐतिहासिक भागांचे ज्या पद्धतीने जतन करण्यात आले आहे त्या पद्धतीने वाराणसीमधल्या भागांचेही जतन करण्यात यावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. मोदी ३ सप्टेंबरपर्यंत जपानमध्ये असतील. जपानच्या सम्राटांचीही ते भेट घेणार आहेत. नरेंद्र मोदींच्या जपान दौर्‍यात पायाभूत सुविधा, अणुऊर्जा, संरक्षण तंत्रज्ञान या क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवण्यावर भर दिला जाण्याची शक्यता आहे.