मुंबई वृत्तान्त
- मुंबईतल्या ८५ टक्के टॅक्सींचे परवाने जुन्या पत्त्यांवरच !
- 'मोबाईल टॉवर' बांधणीबाबत नेमके धोरण व अंमलबजावणी हवी
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- कोल्हापूर, सांगली जिल्ह्य़ात वादळी पावसामुळे नुकसान
- कोल्हापुरातील एलबीटी विरोधातील आंदोलन आजपासून मागे
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
- स्थानिक संस्था कर जकातीशी समतुल्य उद्योगांना सवलती कायम
- विद्यार्थिनींच्या गाडीने सुटीत अर्थार्जनाची गोडी लावली
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- गोंदिया जिल्ह्य़ातील ५१ ग्रामपंचायती होणार हागणदारीमुक्त
- अल्पसंख्याकांचे आर्थिक विकास महामंडळ कागदोपत्रीच
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
अफझल गुरूला फाशी देऊन कॉंग्रेसप्रणीत यूपीए सरकारने एकाच दगडात अनेक पक्षी (राजकीय) जायबंदी केले आहेत. २००१ पासून अफझल गुरूच्या फाशीचा निर्णय प्रलंबित होता. सुशीलकुमार शिंदे यांनी या फाशीच्या मागील राजकारण समजावून घेतले, त्यापाठोपाठ कॉग्रेसच्या नुकत्याच झालेल्या जयपूर अधिवेशनात राष्ट्रीय स्वंयंसेवक संघाच्या कथित देशविरोधी आणि कथित दहशतवादी कारवायांबाबत ठरवून वादळ निर्माण केले गेले. दहशतवादाच्या प्रश्नावरती वेळप्रसंगी हिंदू दोषी आढळले, तर त्यांना आम्ही सोडणार नाही, अशी वातावरण निर्मिती केल्यानंतर आठच दिवसांनी शिंदे यांनी अफझल गुरूची फाईल पुढील प्रक्रियेसाठी पाठवली. हा काही निव्वळ योगायोग नाही. २३ जानेवारीला अफझल गुरूची फाईल फाशीसाठी अंतिम मंजुरीच्या प्रक्रियेला पाठवण्यात आली आणि ९ फेब्रुवारीला गुरूला यमसदनास पाठवण्यात आले. या मागील राजकारण समजून घेणे गरजेचे आहे. भगव्या दहशतवादाबाबत वादाचे मोहोळ उठवून दिले असताना, त्याच वातावरणात अफझल गुरूचा निकाल लावण्यात आला. कॉग्रेसच्या या चतुर राजकारणामुळे संघ भाजपला आता नव्याने आपल्या राजकारणाची आखणी करावी लागेल. संसदेचे अधिवेशन सुरू होत असताना अफझल गुरूला अल्लाघरी पाठवण्यात आल्याने भाजपच्या शिंदे यांच्यावरील बहिष्काराचे काय होणार, हे पाहणे मनोरंजक ठरेल. या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवसांत कथित भगव्या दहशतवादाविषयी अधिक काही घडामोडी घडल्यास वा त्यासंबंधी माहितीबाहेर आल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. त्यामुळे फाशीपेक्षा फाशीच्या दोराला लटकलेले राजकारण समजणे जास्त गरजेचे आहे.




















केंद्रीय गृहमंत्र्यांनी संघावर आरोप केल्यावर लोकसत्ताने ही अफजल गुरूच्या फाशीची तयारी असल्याचे म्हटले होते. ते तंतोतंत खरे ठरले . मुद्दा हा आहे कि अशा देशविघातक अतिरेक्याला फाशी देण्यासाठी वातावरण निर्मिती हवी कशाला ? तो कोणत्याही धर्माचा असेना देश हित सर्वोच्च असले पाहिजे. दुर्दैवाने इथे मुस्लीम समाज कमी पडतो अशी बहुसंख्य हिंदू समाजाची भावना आहे. म्हणून असे कोंग्रेसी राजकारणी देशहिताच्या निर्णयाबाबत घाणेरडे राजकारण करतात.
आपल्या देशात दहशदवाद्यांवर फुले उधळणारे ताठ मानेने जगू शकतात, बियंत सिंहांच्या मारेकर्याचा सन्मान केला जातो , फाशी रद्द करण्यासाठी विधानसभेत कायदा होतो , वर वर मलमपट्टी म्हणून प्याद्यांना फाशी देणे हा उपाय नव्हेच , मुळापर्यंत आपण जाणार आहोत कि नाही ? जन्माने भारतीय असलेले हि लोक देशद्रोह करण्यास मागे पुढे का पाहत नाहीत ? जीव द्यायला हि का तयार होतात ? या पुढे तरुणांनी अश्या वाटेला जाऊ नये म्हणून समाज म्हणून आपण काय प्रबोधन करतो ?चुकीचा इतिहास शिकवून , धर्माचा चुकीचा अर्थ तरुणांपुढे ठेवला जातो , प्रक्षोभक भाषणे देणार्यांवर उशिरा का होईना FIR दाखल केल्यास उस्फुर्त बंद १०० % यशस्वी होतो … इथे ओवैसी ला हि टाळ्या पडताळ व तोगडीयाला हि …. जो पर्यंत समाज बदलणार नाही तोपर्यंत राजकारणी कसे बदलतील… people gets the government they deserve – Thomas Jefferson