मुंबईहून एर्नाकुलम्ला निघालेल्या दुरांतो एक्स्प्रेसचे १० डबे बाळ्ळी रेल्वे स्थानकाजवळ  रविवारी घसरून कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली.  मात्र यामध्ये कोणीही जखमी झाले नाही, असे कोकण रेल्वे महामंडळाचे प्रवक्ते बबन घाटगे यांनी सांगितले.
सकाळी साडेसहाच्या दरम्यान ही घटना घडली. गाडीचे १० डबे घसरल्यामुळे कोकण रेल्वेवरील अनेक गाडय़ा रद्द कराव्या लागल्या. तसेच काही गाडय़ांचे मार्ग वळवावे लागले.
या घटनेमुळे कोकण रेल्वेवरील वाहतूक मोठय़ा प्रमाणावर विस्कळीत होऊन प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. अनेक गाडय़ा अन्यत्र मार्गावरून वळविण्यात आल्यामुळे प्रवाशांना आणखी अडचणी सहन कराव्या लागल्या.