विश्वाची निर्मिती, त्याचे प्रसरण याबाबत बरेच संशोधन झाले असले तरी नवीन अभ्यासानुसार विश्वाच्या मृत्यू प्रक्रियेला हळूहळू सुरुवात झाली आहे. विश्व नष्ट होण्यास किमान १०० अब्ज वर्षे लागणार असल्याने आपण काळजी करण्याचे कारण नाही. आपल्या विश्वात २ लाख दीर्घिका असून त्यांनी निर्माण केलेली ऊर्जा ही दोन अब्ज वर्षांपूर्वी होती त्याच्या निम्मीच आता उरली आहे.
पश्चिम ऑस्ट्रेलियातील इंटरनॅशनल सेंटर फॉर रेडिओ अ‍ॅस्ट्रॉनॉमी रीसर्च या संस्थेच्या वैज्ञानिकांनी जगातील सात शक्तिशाली दुर्बीणींच्या मदतीने २१ विविध तरंगलांबीच्या दीर्घिकांचा अभ्यास केला आहे. या तरंगलांबी अतिनील ते अवरक्त किरणांपर्यंत विस्तारित होत्या. प्राथमिक निरीक्षणानुसार अँग्लो-ऑस्ट्रेलियन दुर्बीणीने न्यू साऊथ वेल्स येथे निरीक्षण करण्यात आले त्यात पूरक निरीक्षणे नासा व युरोपीय अवकाश संस्थेच्या अवकाश दुर्बीणींनी दिली आहेत. गॅलेक्सी अँड मास असेंब्ली प्रोजेक्ट या प्रकल्पात बहुतरंग लांबीच्या दीर्घिकांची ही पाहणी करण्यात आली.
अवकाशातील व जमिनीवरील दुर्बीणींचा वापर यात करण्यात आला. त्यात जास्त तरंगलांबीच्या मर्यादेपर्यंत दोन लाख दीर्घिकांनी बाहेर टाकलेल्या ऊर्जेचे मापन करण्यात आले, असे आयसीआरएआरचे प्राध्यापक सिमॉन ड्रायव्हर यांनी म्हटले आहे. सर्वेक्षणातील माहिती खगोल वैज्ञानिकांना देण्यात आली असून त्यात दोन लाख दीर्घिकांचे २१ तरंगलांबीच्या मदतीने केलेले निरीक्षण आहे. दीर्घिकांची निर्मिती नेमकी कशी होते यावरही त्यामुळे प्रकाश पडणार आहे. विश्व नष्ट होण्याची प्रक्रिया खूप संथ आहे, सर्व तारे संपण्यास किमान १०० अब्ज वर्षे लागतील असे ड्रायव्हर यांचे मत आहे. त्यांनी जीएएमए पथकाचे नेतृत्व करून हा अभ्यास केला आहे. विश्वातील सर्व ऊर्जा महाविस्फोटात तयार झाली असून त्यातील काही भाग वस्तुमानात अडकला आहे. तारे चमकताना वस्तुमानाचे ऊर्जेत रूपांतर करतात हे आईनस्टाईनच्या ‘इ इज इक्वल टू एमसी स्क्वेअर’  या समीकरणाप्रमाणे घडत असते. महाविस्फोटानंतरही विश्वात ऊर्जा निर्माण झाली ती ताऱ्यांनी हायड्रोजन व हेलियम सारखी मूलद्रव्ये सोडल्याने तयार झाली. ही नवीन ऊर्जा धुळीने शोषली किंवा आंतरतारकीय अवकाशात नष्ट झाली, कारण शेवटी ती दुसरे तारे व ग्रह यांच्यावर जाऊन आदळली. विश्वाचा अंत होणार हे १९९० पासूनच लक्षात आले असून अतिनील ते अवरक्त अशा सर्व तरंगलांबीत ही प्रक्रिया घडणार आहे.
खरेतर विश्वाचे म्हातारपण दीर्घकाळ टिकणारे आहे. आता त्याने सोफ्यावर झोपून ब्लँकेट ओढून घेतले आहे पण अंत्यसमय येण्यास असे फार वेळ पडून रहावे लागणार आहे, असे ड्रायव्हर यांचे मत आहे.

विश्वाचा अंत
* ही संकल्पना १९९० मधील आहे.
* अंतास  १०० अब्ज वर्षे लागतील.
* ताऱ्यांनी सोडलेली ऊर्जा कमी होणे हा पुरावा.

Venus And Sun Yuti
हनुमान जयंतीनंतर ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? अनेक वर्षांनी ‘शुक्रादित्य राजयोग’ घडल्याने मिळू शकते व्यवसायात मोठे यश
peter higgs
अन्वयार्थ: ‘देव कणा’मागचा द्रष्टा!
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
risk of H5N1 bird flu outbreak Case Was Seen in Hens At Nagpur
कोविडहुन १०० पट जास्त भीषण विषाणू उड्या मारतोय! नागपुरातही आढळलं प्रकरण, तज्ज्ञांचं मत काय?