पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘जी-२०’ परिषदेत सहभागी होण्यासाठी शुक्रवारी ऑस्ट्रेलियात दाखल झाले. ब्रिस्बेन विमानतळावर मोदी दाखल होताच क्वींसलँडचे प्रथम नागरिक कँबेल न्यूमॅन यांनी मोदींचे स्वागत केले. त्यानंतर मोदी थेट क्वींसलँड विद्यापीठाकडे रवाना झाले. थोड्याच वेळात मोदी या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना संबोधित करणार असून यावेळी मोदींचा तेथील विद्यार्थ्यांसोबत ‘सेल्फी’ अंदाजही पहायला मिळाला. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये मोदींसोबत ‘सेल्फी’ काढला.
नरेंद्र मोदी पाच दिवसीय ऑस्ट्रेलिया दौर्‍यात पंतप्रधान टोनी एबॉट यांची भेट घेतील. दोन्ही नेत्यांमध्ये युरेनियम आणि अन्य अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.