पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील संशयित आणि इंडियन मुजाहिदीन या संघटनेचा दहशतवादी झाहीद हुसेन याला अटक करण्यात कोलकाता पोलीसांना यश आले. कोलकात्यातील रेल्वे स्थानकावर तेथील पोलीसांच्या विशेष पथकाने झाहीद हुसेन याला बुधवारी रात्री अटक केली. हुसेन हा बांगलादेशमधील मिरपूर येथील राहणारा आहे.
इंडियन मुजाहिदीनच्या भारतातील कारवायांमध्ये झाहीद हुसेनची महत्त्वाची भूमिका असायची. तो भारतातील कारवायांसाठी बनावट भारतीय चलन आणि स्फोटके पुरवत असे, अशी माहिती कोलकाता पोलीसांनी दिली. जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातही झाहीद हुसेनचा सहभाग होता. १४ फेब्रुवारी २०१० रोजी झालेल्या या स्फोटामध्ये ९ जण मृत्युमुखी पडले होते. याच स्फोटातील आणखी एक आरोपी आणि इंडियन मुजाहिदीनचा म्होरक्या यासिन भटकळ यालाही पोलीसांनी गेल्यावर्षी अटक केली आहे.

pune police warning goons after Salman Khan House Firing Case
सलमान खानच्या घराजवळ गोळीबार, पुण्यातल्या ‘भाईं’ची झाडाझडती
two accused arrested in Salman Khan house firing case (1)
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोघांना गुजरातमधून अटक, पोलिसांनी व्हिडीओ केला शेअर
Sudhanshu Trivedi BJP
काँग्रेसच्या जाहीरनाम्यात न्यूयॉर्क, थायलंडचे फोटो; भाजपाचा आरोप
mira bhayander vasai virar police commissionerate
भाईंदर मधील १४९ शस्त्रे पोलिसांकडे जमा; ५ जण तडीपार