पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाच्या धर्तीवर देशात जागतिक दर्जाचे दहा द्रुतगती महामार्ग बांधण्याचे काम सुरू केले जाईल असे सरकारने म्हटले आहे. या महामार्गामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीस मदत होईल व प्रवासाचा कालावधी कमी होईल, असा आशावाद केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री गडकरी यांनी सांगितले, की नागपूर-मुंबई, बंगळुरू-चेन्नई, बडोदा-मुंबई, कटरा-अमृतसर, लुधियाना-दिल्ली या मार्गाचे काम सुरू करण्यात येईल. त्यामुळे महत्त्वाच्या शहरांचे देशाच्या विकासात योगदान वाढणार आहे. हे महामार्ग जागतिक दर्जाचे असतील व त्यांची गुणवैशिष्टय़े ही प्रगत देशातील रस्त्यांसारखी असतील. हे रस्ते पूर्ण झाल्यानंतर इंधनाची बचतही होईल.
गडकरी यांच्या राज्यातील कारकीर्दीत मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग बांधून पूर्ण करण्यात आला होता व ते महाराष्ट्रात फ्लायओव्हरसाठी ओळखले जात होते. बंगळुरू-चेन्नई हा २६० किमीचा मार्ग व इतर मार्ग पूर्ण करण्यास सहा हजार कोटी रुपये लागतील असे सांगून गडकरी म्हणाले, की नागपूर-मुंबई महामार्ग हा नागपूर व औरंगाबाद या दोन शहरांना राज्याच्या राजधानीशी जोडणार आहे त्यामुळे वेळ वाचेल. लुधियाना-दिल्ली मार्ग दोन्ही शहरांतील अंतर ५० किमीने कमी करील व चंडीगडलाही जोडला जाणार आहे. देशांतर्गत उत्पन्नाच्या दोन टक्के खर्च या प्रकल्पांवर केला जाणार असून, त्यामुळे दोन वर्षांत अपघातांचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी होईल. दरवर्षी ५ लाख रस्ते अपघातात किमान तीन लाख लोक जायबंदी होतात तर दीड लाख प्राणास मुकतात. महामार्ग व जहाज बांधणी उद्योगात पन्नास लाख लोकांना रोजगार दिला जाईल. त्यात सहा लाख कोटींचे प्रकल्प आहेत.
भारतातील रस्ते
एकूण रस्ते- ३३ लाख किलोमीटर
राष्ट्रीय महामार्ग- ९२८५१ कि.मी.
महामार्गाचे प्रमाण- रस्त्यांच्या १.७ टक्के
वाहतूक- एकूण वाहतुकीच्या ४० टक्के

traffic block, Mumbai-Pune Expressway,
मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर उद्या दोन तासांचा वाहतूक ब्लॉक
heavy vehicles ban on Mumbai Pune Expressway for three days
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर तीन दिवस अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी
1311 objections to the proposed Shaktipeeth Highway
प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोधासाठी १३११ हरकती
navi mumbai, palm beach road
नवी मुंबई: पामबीच मार्गावर वाहतूक संथगतीने