२८ फेब्रुवारी २०१५ रोजी पुणे ते चेन्नई ते पुणे असा ३६ तास २४५० कि.मी.चा खडतर प्रवास आम्हाला करायचा होता. वाकड येथील रॉयल एनफिल्ड या शोरूम येथून निघालो तेथे आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी जवळपास १०० ते १२५ लोक जमा झाले होते. वातावरण पावासाळी होते सुरुवात करताना काळजी वाटत होती व त्यातच लोकांनी दिलेल्या शुभेच्छा व प्रोत्साहन यामुळे आमचा चेन्नईला जाण्याचा उत्साह अधिक वाढला व आम्ही ठीक सायांकाळी ४ वाजता प्रवासास सुरुवात केली. ज्याची भीती वाटत होते तेच झाले. पुण्यापासून २० कि.मी वर खेड शिवापूरजवळ पाऊस सुरू झाला. रस्त्यावर व घाटात दुचाकी गाडय़ाांची घसरण चालू होत होती. पाऊस सुरूच होता. त्यातच आम्ही साताऱ्याच्या अलीकडील खंबाटकी घाट उतरून झाल्यावर आमच्या गाडय़ांचा वेग हळूहळू वाढवू लागलो. नंतर संध्याकाळी ७ वाजता कोल्हापूर गाठले. कोल्हापूरला पेट्रोल भरून झाल्यावर आम्ही हुबळीला जाण्याचा प्रवास सुरू केला. कोल्हापूर ते हुबळी वेगाने प्रवासास सुरुवात केली व सीरा गाठले. सीरा ते बेंगलोर हा मध्यरात्रीचा प्रवास कठीण होता. सकाळी ४ वाजता आम्ही बेंगलोरला पोहचलो. बेंगलोरजवळील नाईसराड येथे एक बालाजीचे मंदिर होते. तेथे काकडआरती चालू होती. त्या आरतीच्या आवाजाने आमचा सर्वाचा उत्साह वाढला व नाइस रोडने चेन्नईच्या दिशेने हंसूर येथे एका पेट्रोल पंपावर आल्यावर मला खूपच थकवा वाटू लागला. डोळ्यांवर अंधारी येऊ लागली. त्यात पाऊस सुरू होता. पुढे जाऊन क्रिष्णगिरी गाठली व चेन्नईच्या प्रवासास सुरुवात केली. दुपारी १२ वाजता आम्ही चेन्नई येथे सुखरूप पोहोचलो.
१२ ते १२.३० या वेळेत घरून आणलेली थालीपिठे खाल् ली पेट्रोल भरले व लगेच १२.३० वाजता परतीच्या प्रवासास सुरुवात केली. ४.५० ते ५च्या सुमारास मी एकटाच तुंकुर येथे पोहोचलो होतो. माझ्या टाग्रेटनुसार हा प्रवास मी ३२ तासांच पूर्ण केला असता जर तुंकुरच्या पुढे सिरा या ठिकाणी आलो असता असे दिसून आले की, माझ्या गाडीचे चेनस्पॉकेट तुटलेले आढळून आले. त्यामुळे माझी गाडी तेथेच नादुरुस्त झाली व रविवार असल्यामुळे मला तेथे गाडीला आवश्यक असणारे स्पेअरपार्ट उपलब्ध होऊ शकले नाही व मी तेथेच मागून येणाऱ्या सहकाऱ्यांची वाट पाहत बसलो.
पाऊण तासाने माझे दोन सहकारी विलीन खारगे, रविराज भोज हे तेथे आले व माझ्यासाठी थांबले होते पण मीच त्यांना सांगितले की, तुम्ही माझ्यासाठी न थांबता पुढे जा व आपण ठरविलेले रेकॉर्ड पूर्ण करा. त्याच मागोमाग अध्र्या तासाने अमित चव्हाण व स्वप्निल उखांडे हेही आले. त्यांनाही मी हेच सांगितले की, तुम्ही पुढे जा व रेकॉर्ड तयार करा. त्याचनंतर आमचे शेवटचे सहकारी संग्राम शेलार हे दहा मिनिटांनी तेथे पोहोचले व मला पिलियन रायडर म्हणून बरोबर घेऊन परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. मग आम्ही हुबळीला पोहचलो हुबळी कोल्हापूरला पोहचल्यावर आम्ही पेट्रोल भरले त्यातच हुबळी पासून जो पाऊस सुरू झाला तो पुण्यातील खेड शिवापूर येथे सुरूच होता व आम्ही ३६ तासांत २४०० कि.मी. प्रवास घडवून आणला व पुढील कागदपत्रांची शहानिशा करण्याचे काम चालू आहे व मी लवकरच अपूर्ण राहिलेले रेकॉर्ड पूर्ण करण्याचे ध्येय साकार करणार आहे.

जर आमच्यासारखे उत्साही रायडर असतील व असे आव्हान स्वीकारण्याची तयारी असेल तर त्यांनी पुढील महत्त्वाच्या बाबीकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
* सर्वात प्रथम त्यांची मानसिक तयारी असणे आवश्यक आहे.
*गाडी पूर्णपणे सव्‍‌र्हिसिंग केलेली असावी व गाडीची १०० ते १५० कि.मी. टेस्ट ड्राइव्ह व अ‍ॅव्हरेज चाचणी करून पाहावी.
* रायडिंग गेअर्स जॅकेट हेल्मेट शूज व एक छोटी पाठीवर बॅग असणे आवश्यक आहे.
* बॅगेत एनर्जी िड्रक व हलके फुलके खाण्याचे पदार्थ.
* योग्य ते व आवश्यक असणारे स्पेअर्स पार्ट्स.
* जाण्याचा मार्ग माहीत असणे आवश्यक अथवा जीपीएस डिव्हाइस जवळ असेल तर उत्तमच.
* वेळोवेळी पेट्रोल भरणे व शक्य असल्यास ५ ते १० लिटर पेट्रोल जवळ ठेवणे आवश्यक.
* मोबाइल पोर्टेबल चार्जर बरोबर असणे आवश्यक आहे.
* जवळ आवश्यकतेनुसार पैसे व कार्ड असणे आवश्यक आहे.
* गाडी चालविताना झोप येत आहे असे वाटल्यास गाडी बाजूला घेऊन सोडय़ाने तोंड धुवावे. झोप येऊ नये म्हणून तोंडात सतत बबलगम व कॉफी चॉकलेट ठेवावे.
* अधिक काही शंका असल्यास फिसोल ग्रुपतर्फे केव्हाही मदत करण्यास तयार आहोत.