पावसाळा आणि मक्याचे भाजलेले कणीस हे समीकरणच न्यारे! भुरूभुरू पाऊस पडत असताना ‘स्वीट कॉर्न’चे भाजलेले, लिंबू आणि मीठ लावलेले कणीस रस्त्याने जाता-जाता किंवा मित्रमैत्रिणींशी गप्पागोष्टी करता करता खाणे हा अनेकांच्या सुट्टीचा कार्यक्रमच असतो. मका हा पिष्टमय पदार्थाचा स्रोत तर आहेच, पण इतरही अनेक पोषकतत्त्वे मक्यातून मिळतात.
मक्याच्या एका कणसात ६ ते ८ ग्रॅम नैसर्गिक साखर असते. मक्यात ‘ब’ आणि ‘क’ जीवनसतत्त्व तर आहेच, पण मॅग्नेशियम आणि पोटॅशियमदेखील मक्यातून मिळते. पिवळ्या रंगाच्या मक्यात ‘अ‍ॅन्टिऑक्सिडंट’चे प्रमाणही उत्तम असते. डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी ही अ‍ॅन्टिऑक्सिडंट फायदेशीर ठरतात. याशिवाय मक्याच्या दाण्यांमध्ये न विरघळणाऱ्या तंतुमय पदार्थाचे प्रमाणही चांगले आहे. हे तंतुमय पदार्थ आपल्या आतडय़ांमधल्या चांगल्या जिवाणूंसाठी पोषक ठरतात.
पावसाळ्यात बाजारात ताजा मका उपलब्ध होऊ लागला आहे. पॅकबंद स्वरूपातले ‘फ्रोजन’ स्वीट कॉर्न तर बारा महिने मिळतातच. मका ताजा असेल तर तो अगदी न भाजता, न उकडताही खाता येतो. आपल्याकडे सर्वसाधारणपणे कणीस भाजून खाण्यास प्राधान्य दिले जात असले तरी ते उकडूनदेखील चांगले लागते. पाण्यात थोडेसे मीठ घालून त्यात मक्याची कणसे उकडा आणि थोडेसे लोणी लावून खाऊन पाहा.  

bullock cart youth death marathi news
सांगली: शर्यतीवेळी बैलगाड्याच्या चाकाखाली सापडून तरुणाचा मृत्यू
98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
young woman saved a caged dog in a burning building shocking video goes viral on social media
जीवाची पर्वा न करता तरुणीने वाचवला पेटत्या इमारतीमध्ये फसलेल्या कुत्र्याचा जीव, VIDEO पाहून येईल अंगावर काटा
vasai fort, compound fencing on vasai fort
वसई किल्ल्याभोवती संरक्षक जाळ्यांचे कुंपण, गैरप्रकार रोखण्यासाठी पुरातत्व विभागाच्या उपाययोजना