युवकांमध्ये सैनिकी प्रशिक्षण रुजविण्याची गरज लक्षात घेऊन १९३५ मध्ये धर्मवीर डॉ. बा. शिं. मुंजे यांनी नाशिकमध्ये भोसला मिलिटरी स्कूलची स्थापना केली असून त्यामध्ये केवळ अभ्यासक्रमच सुरू केले नाहीत तर चांगले विद्यार्थी घडवून संस्थेचे नाव देशविदेशात पोहोचवले आहे. भोसला मिलिटरी स्कूलमध्ये ५वी ते १०वी आणि ११वी व १२वी विज्ञान (महाराष्ट्र स्टेट बोर्ड इंग्रजी माध्यम) अभ्यासक्रमासोबतच विद्यार्थ्यांना लष्करी प्रशिक्षण आणि विविध खेळ त्याचप्रमाणे साहसी उपक्रमांचे प्रशिक्षणही देण्यात येत आहे. भारतीय सैन्य दलात प्रवेश घेण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या एनडीए, सीडीएस आदी परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी भोसला करिअर अ‍ॅकॅडमी हा विभाग कार्यरत आहे.
भोसला मिलिटरी महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान शाखेशी आणि पुणे विद्यापीठाशी संलग्न असणारे अभ्यासक्रम शिकविले जात आहेत. एम.ए. सामरिक शास्त्राबरोबरच जम्मू-काश्मीर या विषयावर विशेष प्रमाणपत्र अभ्यसक्रमही राबविला जात आहे. त्याचप्रमाणे रामभूमी परिसरात भोसला मिलिटरी स्कूल (मुलींचे) ही शाळा नावारूपाला येत आहे. सध्या या शाळेत ६वी ते ८वीसाठी (शालान्त मंडळ इंग्रजी माध्यम) प्रवेश उपलब्ध आहेत. भोसला अ‍ॅडव्हेंचर फाऊंडेशनच्या वतीने संस्थेतील आणि बाहेरील विद्यार्थ्यांना तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या माध्यमातून प्रसिक्षण दिले जात आहे. सैनिकी मूल्य जपून सैनिकी शिक्षण देणारे भोंसला मिलिटरी स्कूल हे सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीअंतर्गत सुरू आहे.

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
“त्याला अशी शिक्षा…”, नेहाचा खून करणाऱ्या फयाजच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
Concession for students to attend school due to highest temperature in state
विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत सवलत… काय आहे शालेय शिक्षण विभागाचा निर्णय?
Admission Delayed, 500 Students of college of physican and surgeon, Maharashtra, 500 Students Still Awaiting Admission, physician students, surgeon students, admission awating physican students,
मान्यतेनंतरही सीपीएस अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू करण्यास मुहूर्त सापडेना, ५०० जागांवरील प्रवेशासाठी विद्यार्थी प्रतीक्षेत
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी