आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताला दोन सुवर्ण तर तीन रौप्य पदके मिळाली आहेत. विशेष म्हणजे यांमध्ये महाराष्ट्रातील दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
ही स्पर्धा यंदा कझाकस्तानमध्ये १३ ते २२ जुलै या कालावधीत पार पडली. स्पध्रेत ८४ देश सहभागी झाले होते. भारतातून पाच जणांचा संघ गेला होता. यातील अनिकेत बाजपेयी आणि रूपांशू गणवीर हे दोन विद्यार्थी महाराष्ट्रातील आहेत. अनिकेतला सुवर्ण तर रूपांशूला रौप्यपदक मिळाले. राजस्थानच्या चित्तरंग मुर्दीया याला सुवर्णपदक मिळाले तर आंध्र प्रदेशचा बुरे विद्यासागर नायडू श्रीकाकुलम आणि पंजाबच्या गुरक्रीत सिंग बाजवा यांनीही रौप्य पदक मिळाले आहे.
कझाकस्तानला गेलेल्या संघासोबत होमी भाभा विज्ञान शिक्षण संस्थेतील डॉ. प्रवीण पाठक, डॉ. राजेश खापर्डे, डॉ. अविनाश मुझुमदार, प्रा. विजय सिंग आणि पुण्यातील डॉ. सी. के. देसाई यांचा समावेश होता.