पोलिस उपनिरीक्षकपदाचा २०१४ च्या परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला असून या परीक्षेत शशांक कदम हा उमेदवार राज्यात प्रथम आला आहे तर महिलांमध्ये तेजश्री पवार ही उमेदवार अव्वल ठरली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पोलिस उपनिरीक्षक पदाच्या २६० जागांसाठी गेल्या वर्षी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत २४६ गुण मिळवून शशांक कदम हा उमेदवार राज्यात पहिला आला आहे. मुलींमध्ये पहिली आलेल्या तेजश्री पवार हिला २०५ गुण मिळाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी सर्वच प्रवर्गाचे कट ऑफ जवळपास १५ गुणांनी घसरले आहेत. गेल्या वर्षी खुल्या प्रवर्गाचे कट ऑफ गुण २२७ होते, तर या वर्षी हे गुण २११ पर्यंत घसरले आहेत. इतर मागासवर्गीय गटाचा (ओबीसी) कट ऑफ २११ वरून १९८ पर्यंत घसरला आहे. अनुसूचीत जाती वर्गाचा कट ऑफ २०८ वरून १८१ पर्यंत खाली आला आहे.