व्यापाऱ्यांच्या जोखडातून शेतकऱ्यांना मुक्त करण्याच्यादृष्टीने शासनाने सुरु केलेला संत शिरोमणी सावता माळी शेतकरी आठवडी बाजाराची सुरुवात कोल्हपुरात २ सप्टेंबरला सासने मदानावर होणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या ५० अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपन्यांचे स्टॉल, बचत गटांचे खाद्य पदार्थाचे स्टॉल, शेतकऱ्यांचे स्टॉल यांचा समावेश असेल, अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी येथे नुकतीच दिली. ‘लोकसत्ता’ने गेल्या पंधरवड्यापूर्वी कोल्हापुरात शेटकेची बाजार सुरु करण्यात येणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते . त्यासाठी दहा प्रमुख स्थळांचा शोध सुरु झाल्याचे नमूद केले होते .
कोल्हापुरात संत शिरोमणी सावता माळी आठवडी बाजाराची सुरुवात करण्याच्या दृष्टीने कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शासकीय विश्रामगृह येथे बठक घेतली. या वेळी महानगरपालिका आयुक्त पी.शिवशंकर, महानगरपालिका उप आयुक्त विजय खोराटे, जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, पणन उप व्यवस्थापक सुभाष घुले उपस्थित होते.
या वेळी मंत्री खोत म्हणाले, कायदे हे शेतकरी आणि ग्राहक या दोहोंच्या फायद्याचे असावेत. आज रस्त्याच्याकडेला कोठेही लोक भाजीपाला घेऊन बसलेले असतात. त्यांना शिस्त असली पाहिजे. उत्पादक आणि ग्राहक अशी बाजाराची साखळी तयार करण्याचे शासनाचे धोरण असून उत्पादकाला दोन पसे जादा मिळाले पाहिजेत. आज मार्केट कमिट्या अडती व व्यापाऱ्यांच्या हातात गेल्या असून उत्पादकांचा थेट मार्केटशी संबंध निर्माण झाला पाहिजे.
आत्माने विक्रीसाठी गट तयार करावेत. शासनाने आत्मांतर्गत प्रोड्युसर कंपन्यांना निधी उपलब्ध करुन दिला आहे, त्यांनी आपला माल थेट विक्रीसाठी बाजारात आणला पाहिजे. जे गट आठवडी बाजारांतर्गत विक्रीला येणार आहेत अशांना टेंट शासनामार्फत उपलब्ध करुन देण्यात येतील. त्याची नोंद पणन आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालय यांच्याकडे राहील, असेही खोत यांनी स्पष्ट केले.

Relief for flood affected Chirner due to works started before monsoon
पावसाळ्यापूर्वी सुरू झालेल्या कामांमुळे पूरग्रस्त चिरनेरला दिलासा?
13 year old school boy dies after drowning in private swimming pool
पुणे: खासगी जलतरण तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू
Pune Rainwater Harvesting Project lead by retired colonel shashikant Dallvi
गोष्ट असामान्यांची Video: पुण्यातील निवृत्त कर्नल शशिकांत दळवींचं ‘मिशन पाणी वाचवा!’
Kolhapur Police arrest gang selling fake notes
बनावट नोटांची छपाई, विक्री करणारी टोळी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात; म्होरक्याचे नेत्यांशी लागेबांधे असल्याची चर्चा