देशाचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्याग केलेल्या आणि देशकार्याप्रती जीवन समíपत केलेल्या स्वातंत्र्यवीरांना शुक्रवारी इचलकरंजीत मानवंदना देण्यात आली. स्वातंत्र्ययुद्धात प्रत्यक्ष सहभागी नसलो, तरी काही क्षणभर तरी स्वातंत्र्ययोद्धे बनून तारुण्याचे सार्थक करण्याची संधी मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यंदा स्वायत्तता मिळवलेल्या डीकेटीई शिक्षण संस्थेच्या राजवाड्यातील स्नेहसंमेलनला देशप्रेमाचे तोरण लागल्याचे दिसत होते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी कष्ट घेतलेल्यांचे पुण्यस्मरण हा ऋणनिर्देश भावी पिढीसाठी मार्गदर्शक ठरला. नव्या पिढीने ‘ट्रॅडिशनल डे’ अशा पद्धतीने साजरा करून एक वेगळा आदर्श ठेवला.   स्नेहसंमेलनाचे उद्घाटन भारतमातेच्या पूजनाने करण्यात आले. या वेळी सचिव डॉ. सपना आवाडे, प्राचार्य प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले उपस्थित होते. प्रा. सचिन कानिटकर व त्यांचे सहकारी यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला. त्यानंतर ट्रॅडिशनल डे अर्थात पारंपरिक पोशाख दिवस साजरा करण्यात आला. त्यात सन्यमार्ग, क्रांतिमार्ग व सत्याग्रह अशा तीनही मार्गाने स्वातंत्र्याचा लढा दाखवण्यात आला. झांशीची राणी, सावरकर, टिळक, भगतसिंग, चापेकर बंधू अशा थोर देशभक्तांच्या जीवनातील १२ प्रसंग सादर करण्यात आले. यात जालीयनवाला बाग हत्याकांड, रँडचा वध, अ‍ॅसेब्लीत बॉम्ब फेक इ. अनेक प्रसंग जिवंत झाले व सर्व वातावरण वंदे मातरम्, भारतमाता की जय, इन्किलाब िझदाबाद आदी घोषणांनी भारावून गेले.

विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यवीरांची आठवण काढत वीरगती प्राप्त केलेल्या स्वातंत्र्यवीरांच्या पोशाखामध्ये विविध संकल्पनांचे सादरीकरण केले. या स्वातंत्र्य संग्रामासाठी लालकिल्ल्याचे प्रवेशद्वार उभे करण्यात आले. तेथेच ढोलपथकाने मानंवदना दिली.

Baramati Namo Maharojgar Melava
निमंत्रण पत्रिकेतील आणखी एक घोळ सुधारण्यासाठी प्रशासनाची धावाधाव
After Thackeraysena agitation in Kolhapur road works started
ठाकरेसेनेच्या आंदोलनानंतर महापालिकेला जाग; कोल्हापुरात रस्ते कामांना सुरुवात
fm nirmala sitharaman directed regulators to take more stringent steps against fraudulent loan apps
फसव्या ‘लोन ॲप’वर अंकुश; अर्थमंत्री सीतारामन यांचे नियामकांना आणखी कठोर पावले टाकण्याचे निर्देश
Jayant Patil son
जयंत पाटील यांना मुलाच्या राजकीय भवितव्याची काळजी

दरवर्षी विविध विषयातून डीकेटीईचे विद्यार्थी भारतीय संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडवितात. अनिकेत तापोळे व गिरीश या विद्यार्थ्यांनी संयोजनाचे कार्य केले.