बीजिंग ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा याने वैयक्तिक व सांघिक अशा दोन्ही विभागांत सुवर्णपदक जिंकले आणि हनोव्हर येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत दुहेरी मुकुट मिळविला.
जर्मनीत सुरू असलेल्या या स्पर्धेत जगातील एक हजाराहून अधिक खेळाडूंनी भाग घेतला आहे. बिंद्रा याने १० मीटर एअर रायफलमध्ये सोनेरी कामगिरी केली. त्याचा सहकारी चैनसिंग याने ५० मीटर रायफल प्रोनमध्ये सुवर्णपदक जिंकले. बिंद्रा व चैनसिंग यांनी गगन नारंगच्या साथीत सांघिक विभागात सुवर्णपदक मिळविले. नारंग याने या स्पर्धेतील रायफल थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदक पटकाविले.
भारताची उदयोन्मुख खेळाडू अपूर्वी चंडेला हिने महिलांच्या एअर रायफलमध्ये कांस्यपदक मिळविले. भारताचे हे सर्व खेळाडू पुढील आठवडय़ात अमेरिकेत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय रायफल व पिस्तूल स्पर्धेत सहभागी होणार आहेत. रिओ येथे पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता करण्यासाठी ही स्पर्धा महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

Champions League Football Barcelona beat Paris Saint Germain sport news
चॅम्पियन्स लीग फुटबॉल: बार्सिलोनाची पॅरिस सेंट-जर्मेनवर मात
Cash prize from Paris Olympics to gold medal winning athletes
सुवर्णपदकविजेत्या अ‍ॅथलेटिक्सपटूंना पॅरिस ऑलिम्पिकपासून रोख पारितोषिक! जागतिक अ‍ॅथलेटिक्स संघटनेचा निर्णय
national boxing championship marathi news
नागपूरच्या समीक्षा, अनंतने जिंकले राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक
ben stoke
बेन स्टोक्सची ट्वेन्टी-२० विश्वचषकातून माघार