रोहन बोपण्णा आणि फ्लोरिन मर्गेआ जोडीने वॉशिंग्टन येथे सुरू असलेल्या सिटी ओपन खुल्या टेनिस स्पर्धेत उपान्त्यपूर्व फेरीत आगेकूच केली. बोपण्णा-मर्गेआ जोडीने अँडी मरे आणि डॅनियल नेस्टर जोडीवर २-६,  ६-१, १०-३ अशी मात केली. उपान्त्यपूर्व फेरीत त्यांचा मुकाबला ग्रिगोर दिमित्रोव्ह आणि मर्डी फिश जोडीशी होणार आहे. एकेरी प्रकारात सोमदेव देववर्मनला पात्रता फेरीतच पराभवाला सामोरे जावे लागले.