आघाडीचे फलंदाज अपयशी ठरल्यावर आदित्य तरेने (३७) केलेल्या संयमी फलंदाजीनंतर गोलंदाजीत निराशा केल्यामुळे मुंबई इंडियन्सला  चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात लाहोर लायन्सकडून ६ विकेट्सनी पराभव पत्करावा लागला. उमर अकमलच्या नाबाद ३८ धावांच्या खेळीमुळे लाहोर लायन्सने मुंबई इंडियन्सचे १३६ धावांचे आव्हान आठ चेंडू राखून पार केले.