भारत दौऱयासाठी ऑस्ट्रेलिया संघाच्या फिरकी गोलंदाजीचा सल्लागार म्हणून ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने इंग्लंडचा माजी फिरकीपटू मॉन्टी पानेसर याची नियुक्ती केली आहे. भारतीय खेळपट्टीवर कशाप्रकारे गोलंदाजी करावी याचे धडे मॉन्टी पानेसर ऑस्ट्रेलियाच्या फिरकीपटूंना देणार आहे. याशिवाय, भारताच्या अश्विन आणि जडेजा या फिरकीजोडीचा सामना कसा करावा? याचे टीप्स देखील पानेसर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना देणार आहे.

वाचा: इंग्लंड दौऱ्यानंतर तंत्रामध्ये बदल केला – कोहली

 

भारतीय संघाने मायभूमीत गेल्या वर्षभरात एकही मालिका गमावलेली नाही. कसोटी संघाच्या क्रमवारीत भारतीय संघ अव्वल स्थानी आहे. त्यामुळे भारतीय संघासमोर कडवे आव्हान देण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ कसून तयारी करत आहे. भारत दौऱयासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ दुबईमध्ये सराव करणार असल्याचे याआधी जाहीर करण्यात आले होते. विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील संघाने न्यूझीलंड आणि इंग्लंडला व्हाईटवॉश दिला होता. ऑस्ट्रेलियन संघाने याचाच धसका घेतल्याचे दिसून येते. ३४ वर्षीय पानेसर सिडनीच्या स्थानिक संघाकडून देखील खेळलेला आहे. यापुढील काळात तो ऑस्ट्रेलियाच्या फिरकीपटूंना गोलंदाजीचे सल्ले देताना दिसेल. मॉन्टीच्या समावेशामुळे आम्हाला भारतीय खेळपट्टीवर खेळण्यासाठीचा विचार करताना आता आणखी मदत होईल, असे होवार्ड यांनी ‘क्रिकइन्फो’शी बोलताना सांगितले.
मॉन्टी पानेसरने इंग्लंडकडून खेळताना तीन वेळेस भारत दौरा केला आहे. यात त्याने १७ विकेट्स घेतल्या होत्या. इंग्लंडच्या संघाने भारतीय संघाला २०१२ साली २-१ अशी मात दिली होती. तब्बल २७ वर्षांनंतर इंग्लंडच्या संघाने भारतीय संघावर भारतात मात केली होती.

वाचा: ..अन् दिग्गजांना घाम फुटला!