जपानकडून २-० असा पराभव; ७-८व्या स्थानासाठी शनिवारी लढत

पुढील वर्षी इंग्लंडमध्ये होणाऱ्या महिला विश्वचषक हॉकी स्पध्रेत खेळण्याचे भारतीय संघाचे स्वप्न जवळपास धुळीस मिळाले आहे. जोहान्सबर्ग येथे सुरू असलेल्या जागतिक महिला हॉकी लीगच्या उपांत्य फेरीच्या टप्प्यात जपानच्या संघाने ५ ते ८ स्थानांसाठीच्या लढतीत गुरुवारी भारतावर २-० असा विजय मिळवला. या विजयाबरोबर जपानने विश्वचषक स्पध्रेची पात्रताही निश्चित केली आहे, परंतु भारताचा मार्ग खडतर बनवला.

Sanju Samson should be groomed as next T20 captain for India after Rohit says Harbhajan Singh
Team India : रोहितनंतर भारताचा टी-२० कर्णधार कोण होणार? हार्दिक-पंतकडे दुर्लक्ष करत हरभजनने सांगितले ‘हे’ नाव
Questions before the selection committee regarding the selection of Gill and Jaiswal for the Twenty20 World Cup cricket tournament
गिल की जैस्वाल? ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी निवड समितीसमोर यक्षप्रश्न
Change in train schedule due to night block at Vikhroli
विक्रोळीतील रात्रकालीन ब्लॉकमुळे रेल्वेच्या वेळापत्रकात बदल
IPL 2024: Mumbai Indians vs Rajasthan Royals
IPL 2024 : घरच्या मैदानावर खेळ बहरणार? वानखेडेवर आज मुंबई इंडियन्ससमोर राजस्थान रॉयल्सचे आव्हान

या वर्षअखेरीस होणाऱ्या आशियाई चषक स्पध्रेत विजेतेपद पटकावून विश्वचषक स्पध्रेची पात्रता निश्चित करण्याची अखेरची संधी भारतीय संघाला आहे. विश्वचषक स्पध्रेची पात्रता डोळ्यांसमोर ठेवून मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला सुरुवातीलाच गोल करण्याची संधी मिळाली. मात्र मोनिकाचा गोल करण्याचा तो प्रयत्न जपानची गोलरक्षक मेगुमी कॅगेयामाने अपयशी ठरवला. पुढच्याच मिनिटाला जपानच्या आक्रमकपटूंनी जोरदार खेळ करताना भारताची बचावफळी खिळखिळीत केली. या आक्रमक खेळाने त्यांना सातव्या मिनिटाला पहिली पेनल्टी कॉर्नर मिळवून दिली. काना नोमुराने त्यावर गोल करताना जपानला १-० अशी आघाडी मिळवून दिली. आठव्या आणि १०व्या मिनिटाला जपानला पुन्हा पेनल्टी कॉर्नर मिळाला, परंतु मोनिका व सविता यांनी अचूक बचाव केला.

दुसऱ्या सत्रात भारतीय आक्रमकपटूंनी शैलीत बदल करून जपानचा बचाव भेदण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना अपयश आले. अकिको काटोने अप्रतिम ड्रिब्लिंगचे कौशल्य दाखवताना गोल करण्याचे सात्यत्याने प्रयत्न केला. मात्र या वेळी भारतीय गोलरक्षक सविताने तिला रोखले. २९व्या मिनिटाला नाहो इचितानीने पेनल्टी कॉर्नरवर गोल करून जपानची आघाडी २-० अशी मजबूत केली. मध्यंतरानंतर भारतीय खेळाडूंनी उल्लेखनीय खेळ केला, परंतु त्यांना पराभव टाळण्यात अपयश आले.