इंग्लंड आणि वेल्समध्ये रंगलेल्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेनंतर भारतीय संघ शुक्रवार पासून कॅरेबियन मैदानात उतरणार आहे. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारतीय संघाने दमदार कामगिरी करत अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली होती. तर दुसरीकडे आयसीसी क्रमवारीतील अव्वल आठ संघात स्थान नसल्यामुळे वेस्ट इंडिज संघ या स्पर्धेस मुकला होता. अर्थात आकडेवारीच्या तुलनेत तसेच वेस्टइंडिज दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय संघ वेस्ट इंडिजपेक्षा भारी आहे. त्यामुळे घरच्या मैदानात कॅरेबियनसमोर कसोटी असणार आहे. यात शंका नाही.

वेस्ट इंडिज दौऱ्यातील पहिले दोन सामने पोर्ट ऑफ स्पेनच्या क्विन पार्क मैदानावर खेळविण्यात येणार असून, तिसरा आणि चौथा सामना हा सर व्हिव रिचर्डस अँटिगामध्ये रंगणार आहे. तर पाचवा सामना हा सबिना पार्क, किंगस्टन जमैकाच्या मैदानावर खेळवण्यात येईल. एकदिवसीय मालिकेतील अखेरचा आणि एकमेव टी-ट्वेटी सामना देखील याच मैदानात रंगेल.

पहिला सामना शुक्रवार, २३ जून २०१७ (क्विन पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन) भारतीय प्रमाण वेळेनुसार सामना सायंकाळी ६.३० वाजता

दुसरा सामना रविवार, २५ जून २०१७ (क्विन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन) भारतीय प्रमाण वेळेनुसार सामना सायंकाळी ६.३० वाजता

तिसरा सामना शुक्रवार, ३० जून २०१७ (सर व्हिव रिचर्डस स्टेडियम, अँटिगा) भारतीय प्रमाण वेळेनुसार सामना सायंकाळी ६.३० वाजता

चौथा सामना रविवार, २ जुलै २०१७ (सर व्हिव रिचर्डस स्टेडियम, अँटिगा) भारतीय प्रमाण वेळेनुसार सामना सायंकाळी ६.३० वाजता

पाचवा सामना गुरुवारी ६ जुलै २०१७ (सबिना पार्क, किंगस्टन जमैका) भारतीय प्रमाण वेळेनुसार सामना सायंकाळी ६.३० वाजता

टी-२० रविवार, ९ जुलै २०१७ सबिना पार्क, किंगस्टन जमैका) रात्री भारतीय प्रमाण वेळेनुसार सामना ९.०० वाजता