दिग्गज संघांना पराभूत करण्याची किमया साधणाऱ्या आर्यलडच्या यादीत आणखी एका विजयाची भर पडली आहे. जमैकाच्या सबिना पार्कवर झालेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात आर्यलडने ट्वेन्टी-२० विश्वविजेत्या वेस्ट इंडिजचा सहा विकेट राखून पराभव
केला. २००७च्या विश्वचषक क्रिकेट स्पध्रेत किंग्स्टनच्या याच मैदानावर आर्यलडने पाकिस्तानवर नाटय़मय विजयाची नोंद केली होती. विंडीजने नाणेफेक जिंकल्यावर प्रथम फलंदाजी स्वीकारली. परंतु आर्यलडने यजमानांना २० षटकांत ८ बाद ११६ धावसंख्येवर सीमित राखले. त्यानंतर आर्यलडने ५ चेंडू शिल्लक असतानाच हे आव्हान पादाक्रांत केले. एड जॉयसेने ४० आणि अ‍ॅन्ड्रय़ू पॉइंटरने ३२ धावा केल्या.