वानखेडेवर तिसऱया दिवशी ‘कोहली’नामा पाहायला मिळाला. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीमध्ये शतक ठोकल्यानंतर शांत दिसलेल्या कोहलीने वानखेडेवर मात्र शतक गाठल्यानंतर मोठ्या जल्लोषात शतक साजरे केले आणि चाहत्यांना पुन्हा एकदा आक्रमक विराट पाहायला मिळाला.
कोहलीच्या नाबाद १४७ धावांच्या जोरावर भारतीय संघाला वानखेडे कसोटीत तिसऱया दिवसाच्या अखेरीस ५१ धावांची आघाडी घेतला आली आहे. तिसऱया दिवसाच खेळ संपला तेव्हा भारताची धावसंख्या ७ बाद ४५१ अशी आहे. कोहलीच्यासाथीला जयंत यादव ३० धावांवर नाबाद आहे. विराटने आपल्या १५ व्या आंतरराष्ट्रीय कसोटी शतकासह यंदाच्या वर्षात १ हजार धावांचा टप्पा देखील गाठला. याशिवाय त्याने कसोटी कारकिर्दीतील चार हजार धावांचा टप्पा देखील ओलांडला. विशेष म्हणजे, इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेतच कोहलीने ५०० धावा कुटल्या आहेत.

आजच्या दिवसाच्या खेळाला सुरूवात झाल्याच्या पहिल्याच षटकात भारतीय संघाला मोठा धक्का बसला होता. चेतश्वर पुजारा ४७ धावांवर क्लीनबोल्ड होऊन माघारी परतला. जेक बॉलने पुजाराची विकेट घेतली. पुजारा बाद झाल्यानंतर विराट कोहलीने मुरली विजयला चांगली साथ दिली. मुरली विजयने यावेळी १३६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली, तर कोहलीने मैदानात कर्णधारी खेळी करून आपले १५ वे आंतरराष्ट्रीय कसोटी शतक पूर्ण केले. मुरली विजयने पहिल्या दिवसाप्रमाणेच दुसऱया दिवशी देखील आपला दमदार फॉर्म कायम ठेवत कसोटी कारकिर्दीतील आपले ८ वे आंतरराष्ट्रीय शतक ठोकले. उपहारापर्यंत भारताने २ बाद २४७ धावा केल्या होत्या. दुसऱया सत्रात मुरली विजय फिरकीपटू रशीदच्या फूलटॉस चेंडूवर स्ट्रेड ड्राईव्ह मारण्याच्या नादात झेलबाद झाला.

मुरली विजयने १३६ धावा केल्या. मुरली विजय बाद झाल्यानंतर करुण नायर मैदानात दाखल झाला. करुण नायरने पहिल्या चेंडूवर चौकार मारून दमदार सुरूवात केली खरी पण तो मोईन अलीच्या फिरकीवर १३ धावांवर पायचीत होऊन माघारी परतला. इंग्लंडच्या गोलंदाजांना यश मिळत नसताना जो रुटला गोलंदाजीसाठी पाचारण करण्यात आले आणि त्याने आपल्या पहिल्या दोन षटकांत दोन विकेट्स घेऊन भारतावर दबाव निर्माण करण्यात यश मिळवले. जो रुटने पार्थिव पटेल याला २५ धावांवर तर अश्विनला शून्यावर बाद केले. विराट कोहलीने यावेळी पुन्हा एकदा आश्वासक खेळी करून संघाला सावरले.

तत्पूर्वी, कसोटीच्या दुसऱया दिवसाच्या अखेरीस भारतीय संघाने एका विकेटच्या मोबदल्यात १४६ धावा केल्या होत्या. पुजारा आणि मुरली विजय जोडी तिसऱया दिवशी देखील इंग्लिंश गोलंदाजांच्या नाकी नऊ आणेल अशी आशा होती. पण इंग्लंडच्या जेकब बॉलने भारताचे मनसुबे फोल ठरवले. त्याने आपल्या पहिल्याच षटकात पुजाराला क्लीनबोल्ड करून माघारी धाडले.

इंग्लंडने पहिल्या दिवशी किटन जेनिंग्सच्या पदार्पणीय शतकाच्या बळावर पावणेतीनशे धावांपर्यंत मजल मारली होती. मात्र धावांचा हा ओघ त्यांना दुसऱ्या दिवशी राखता आला नाही. फक्त ११२ धावांत इंग्लंडचा उर्वरित निम्मा संघ गारद झाला. इंग्लंडला सव्वातीनशे धावांत रोखू, असे अश्विनने गुरुवारी आत्मविश्वासाने सांगितले होते. पण त्याच्या आशा फोल ठरल्या. तळाच्या फलंदाजांना साथीला घेत जोस बटलरने (७६) झुंजार खेळी उभारली. त्यामुळे इंग्लंडला चारशे धावांपर्यंत पोहोचता आले. इंग्लंडने वानखेडेवरील सलग तिसऱ्या कसोटीत चारशे धावांचा टप्पा ओलांडून भारतावरील दडपण वाढवले आहे. याआधी २००६मध्ये ४०० आणि २०१२मध्ये ४१३ धावा उभारल्यानंतर ते दोन्ही कसोटी सामने भारताने जिंकले होते.

Cricket Score , India vs England : दिवसभरातील अपडेट्स

Live Updates
16:33 (IST) 10 Dec 2016
विराट कोहली १४७ धावांवर, तर जयंत यादव ३० धावांवर नाबाद
16:33 (IST) 10 Dec 2016
आजच्या दिवसाचा खेळ संपला, भारत ७ बाद ४५१ धावा; भारताकडे ५१ धावांची आघाडी
16:32 (IST) 10 Dec 2016
दोन चेंडू निर्धाव
16:31 (IST) 10 Dec 2016
तिसऱया चेंडूवर कोहलीकडून एक धाव, भारत ७ बाद ४५१
16:30 (IST) 10 Dec 2016
दुसरा चेंडू देखील निर्धाव
16:30 (IST) 10 Dec 2016
जो रुट टाकतोय षटक, पहिला चेंडू निर्धाव
16:30 (IST) 10 Dec 2016
आजच्या दिवसातील शेवटचे षटक
16:30 (IST) 10 Dec 2016
मोईन अलीकडून निर्धाव षटक, भारत ७ बाद ४५० धावा
16:26 (IST) 10 Dec 2016
१४० षटकांच्या अखेरीस भारत ७ बाद ४५० धावा. (कोहली- १४६, जयंत- २९), भारताकडे ५० धावांची आघाडी
16:21 (IST) 10 Dec 2016
मोईन अलीच्या फिरकीवर जयंत यादव यष्टीरक्षक बेअरस्टोकरवी झेलबाद झाल्याची अपील, पण पंचांचा नकार
16:16 (IST) 10 Dec 2016
कोहलीचा स्ट्रेट ड्राईव्ह चौकार, भारत ७ बाद ४४४ धावा
16:16 (IST) 10 Dec 2016
कोहली आणि जयंत यादवची जोरदार फटकेबाजी
15:55 (IST) 10 Dec 2016
१३२ षटकांच्या अखेरीस भारत ७ बाद ४१७ धावा, भारताकडे १७ धावांची आघाडी
15:54 (IST) 10 Dec 2016
विराट कोहली आणि जयंत यादवची अर्धशतकी भागीदारी
15:53 (IST) 10 Dec 2016
विराट कोहलीचा डीप मिड विकेटवर चौकार, भारत ७ बाद ४१६ धावा
15:52 (IST) 10 Dec 2016
इंग्लंडचा दुसरा रिव्ह्यू देखील वाया, जयंत यादव नाबाद असल्याचे निष्पन्न
15:51 (IST) 10 Dec 2016
इंग्लंडकडून रिव्ह्यूची मागणी
15:51 (IST) 10 Dec 2016
अँडरसनच्या गोलंदाजीवर जयंत यादव झेलबाद झाल्याची अपील, पण पंचांचा नकार
15:49 (IST) 10 Dec 2016
स्वेअर लेगवर कोहलीकडून दोन धावा
15:49 (IST) 10 Dec 2016
विराट कोहलीचा स्ट्रेट ड्राईव्ह चौकार
15:48 (IST) 10 Dec 2016
स्लिपमध्ये जयंत यादवचा झेल जो रुटकडून सुटला, जयंत यादवला जीवनदान
15:47 (IST) 10 Dec 2016
इंग्लंडने नवीन चेंडू स्विकारला
15:43 (IST) 10 Dec 2016
कोहलीचा दमदार चौकार
15:42 (IST) 10 Dec 2016
भारतीय संघाने इंग्लंडच्या पहिल्या डावातील ४०० धावांच्या आव्हानाचा आकडा गाठला, आता आघाडीला सुरूवात
15:31 (IST) 10 Dec 2016
कोहलीकडून तीन धावा, भारत ७ बाद ३९९ धावा
15:31 (IST) 10 Dec 2016
कोहलीकडून डीप मिड विकेटवर चौकार
15:30 (IST) 10 Dec 2016
बेअर स्टोकडून गचाळ यष्टीरक्षण, चौकार
15:24 (IST) 10 Dec 2016
१२५ षटकांच्या अखेरीस भारत ७ बाद ३८७ धावा. (कोहली- १११, जयंत- ६)
15:21 (IST) 10 Dec 2016
कोहलीकडून कव्हर्सच्या दिशेने दोन धावा
15:19 (IST) 10 Dec 2016
इंग्लंडच्या फिरकीवर जयंत यादवची सावधगिरीने फलंदाजी
15:19 (IST) 10 Dec 2016
खेळपट्टीवर चेंडूला चांगली फिरकी मिळत असल्याचे दिसत आहे
15:18 (IST) 10 Dec 2016
कोहलीचा शानदार चौकार
15:08 (IST) 10 Dec 2016
रिव्ह्यूमध्ये जयंत यादव नाबाद असल्याचे निष्पन्न, इंग्लंडचा रिव्ह्यू वाया
15:08 (IST) 10 Dec 2016
इंग्लंडकडून रिव्ह्यूची मागणी
15:08 (IST) 10 Dec 2016
रशीदच्या फिरकीवर जयंत यादव पायचीत झाल्याची अपील, पण पंचांचा नकार
15:06 (IST) 10 Dec 2016
१२१ षटकांच्या अखेरीस भारत ७ बाद ३७६ धावा. (कोहली- १०४, जयंत- ३)
15:04 (IST) 10 Dec 2016
शतक ठोकल्यानंतर कोहलीचा कव्हर्सवर खणखणीत चौकार
15:03 (IST) 10 Dec 2016
विराट कोहलीचे १५ वे आंतरराष्ट्रीय कसोटी शतक पूर्ण
15:02 (IST) 10 Dec 2016
दुसऱया चेंडूवर कोहलीकडून एक धाव आण कोहलीचे शतक पूर्ण
15:02 (IST) 10 Dec 2016
पहिला चेंडू निर्धाव
15:01 (IST) 10 Dec 2016
जेक बॉल टाकतोय षटक, कोहली स्ट्राईकवर
15:00 (IST) 10 Dec 2016
१२० षटकांच्या अखेरीस भारत ७ बाद ३६९ (कोहली- ९९, जयंत- २)
14:59 (IST) 10 Dec 2016
जयंत यादवकडून दोन धावा, भारत ७ बाद ३६९ धावा
14:57 (IST) 10 Dec 2016
कोहलीकडून मिड विकेटवर एक धाव, कोहली पोहोचला ९९ धावांवर
14:56 (IST) 10 Dec 2016
जेक बॉलकडून निर्धाव षटक, भारत ७ बाद ३६६ धावा
14:54 (IST) 10 Dec 2016
जडेजा बाद झाल्यानंतर जयंत यादव फलंदाजीसाठी मैदानात
14:49 (IST) 10 Dec 2016
मोठा फटका मारण्याच्या नादात जडेजा २५ धावांवर झेलबाद, भारताला सातवा धक्का
14:48 (IST) 10 Dec 2016
११७ षटकांच्या अखेरीस भारत ६ बाद ३६४ धावा. (कोहली- ९६ , जडेजा- २५ )
14:46 (IST) 10 Dec 2016
विराट कोहली शतकाच्या उंबरठ्यावर
14:44 (IST) 10 Dec 2016
विराट कोहली आणि जडेजाची अर्धशतकी भागीदारी