राजकोटमध्ये मुंबई इंडियन विरूध्द  गुजरात लायन्स ही मॅच पाहायला आलेल्या प्रेक्षकांना एक पैसा वसूल मॅच पहायला मिळाली. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला धूळ चारल्यानंतर गुजरात लायन्सचा आत्मविश्वास वाढला होता. त्यामुळे मुंबई इंडियन्सनाल हरवायला गुजरातचा संघ उत्सुक होता. पण या मॅचमध्ये त्यांच्या पटापट विकेट्स पडत गेल्या आणि १५३ रन्सवर त्यांना रोखण्यात मुंबई इंडियन्स यशस्वी ठरले. १०० रन्स होण्याआधी गुजरातचा निम्मा संघ तंबूमध्ये परतला होता यावेळी गुजरातला मुंबईु १२०-१३० रन्समध्येच गुंडाळणार की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. पण गुजरातच्या तळाच्या बॅट्समन्सनी चांगली फटकेबा जी केल्याने गुजरातला १५३ ची मजल मारतात आली.

उत्तरादाखल मुंबईने सुरूवात तर चांगली केली पण जाॅस बटलर, नितीश राणासारखे खेळाडू काहीसे झटपट आऊट झाले. त्यानंतरही मुुबईचा खेळ चांगला पण नंतर अचानकपणे मुंबईच्या डावाची घसरगुंडी उडत १५३ रन्सवर टाय झाला.

‘टाय’ सोडवण्यासाठी सुरू झालेल्या सुपर ओव्हरमध्ये कायरन पाॅलार्डच्या फटकेबाजीमुळे मुंबईने १२ रन्स केल्या. या रन्सचा बचाव करायला बाॅल लसिथ मलिंगाच्या हातात सोपवला जाणार अशी सगळ्य़ांची अटकळ होती. पण कर्णधार रोहित शर्माने बाॅल जसप्रीत बुमराच्या हातात सोपवल्याने काहीसं आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. त्यातच त्याने पहिला नोबाॅल टाकल्याने तर सगळ्या फॅन्सनी डोक्याला हात लावून घेतला पण त्यानंतर त्याने अप्रतिम स्लो बाॅल्स टाकत मॅच मुंबई इंडियन्सना जिंकून दिली.

आजच्या या विजयानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे तर गुजरात लायन्स पाचव्या क्रमांकावर आहेत.