रोहन दाणी व श्वेता भगत यांच्याकडे राष्ट्रीय शालेय रोलबॉल स्पर्धेसाठी अनुक्रमे १९ वर्षांखालील मुले व मुली संघांचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. ही स्पर्धा गुरुवारपासून येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत होणार आहे.
महाराष्ट्र संघ- १९ वर्षांखालील मुले- रोहन दाणी (कर्णधार), रोहन दाभाडे, सोहम सांडभोर, सागर राजेशिर्के, प्रफुल्ल कचरे, नयन साळुंके, साकेत वाणी, वैभव गुर्रम, असजद पटेल, रोहन आदिक, शुभम निंबाळकर, जैफ डीसूझा. मार्गदर्शक-प्रभाकर वडवेराज. मुली-श्वेता भगत (कर्णधार), शिवानी महाजन, अंजली कपूर, अंकिता कुडले, तेजस्विनी आव्हाड, नलिनी चौधरी, चांदनी अमोलिक, अश्विनी वदे, अपर्णा हजारे, शिवानी पाटील, आफिया शेख, देवांगी पाटील. मार्गदर्शक- हेमांगिनी काळे.
१७ वर्षांखालील मुले-अभिषेक कुलकर्णी (कर्णधार), अनय पाटील, तेजस सावंत, जय सडेकर, स्वानंद वैद्य, अलोक आगाशे, अक्षय खानझोडे, योगेश तायडे, रोहित काकडे, मोईन शेख, हेरंब वडावकर, शिवम निखाडे. मार्गदर्शक-अशोक काळे. मुली-ऐश्वर्या सावंत (कर्णधार), सारा अन्वर, समुेधा बोराडे, केतकी एकतपुरे, मधुश्री ढेरे, मानसी मारणे, मीनल हजारे, दिव्या ठाकूर, निकिता चांदस्कर, मुस्कान बालानी, संजना शर्मा, वेदिका चंदेल. मार्गदर्शक- देवयानी दाभाडे, व्यवस्थापिका- वैशाली दरवड.