विश्वचषकाचा अंतिम सामना ‘टाय’ झाल्यास ‘सुपर ओव्हर’चा थरार क्रिकेटरसिकांना अनुभवता येणार आहे. मागील विश्वचषकाच्या सामन्यांतून धडा घेत आयसीसीच्या कार्यकारी मंडळाने या नियमावर शिक्कामोर्तब केले आहे.
षटकांची धिमी गती या संदर्भातील आयसीसीच्या आचारसंहितेतही बदल करण्यात आले. षटकांच्या धिम्या गतीबद्दल आता आयसीसीच्या स्पध्रेत कर्णधाराला आधीच्या सामन्याचे ओझे बाळगून निलंबनाची शिक्षा भोगावी लागणार नाही. त्यामुळे सर्व कर्णधार धिम्या गतीच्या कोणत्याही ठपक्यासह या स्पध्रेत सामील होतील. परंतु विश्वचषक सामन्यांत मात्र ही गोष्ट घडल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकेल. याचाच अर्थ आयसीसीच्या स्पध्रेआधीचे कोणतेही ठपके या स्पध्रेनंतरच्या मालिकांमध्ये ग्राह्य मानण्यात येतील.
ऑस्ट्रेलियाचा फलंदाज फिलिप ह्युजेसचा प्रथम श्रेणी सामन्यात काही महिन्यांपूर्वी दुर्दैवी मृत्यू झाला. या पाश्र्वभूमीवर आयसीसीतर्फे क्रिकेट हेल्मेट आणि सुरक्षितता या विषयावर संशोधनाचे खेळाडूंना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.