अहमदाबादच्या मैदान मारुन तिसऱ्यांदा कबड्डी विश्वचषक उंचावणाऱ्या भारतीय संघावर ट्विटरच्या माध्यमातून कौतुकाचा वर्षाव सुरु झाला आहे. तिसऱ्या विश्वचषकात भारताने इराणला सलग तिसऱ्यांदा पराभूत करत विश्वचषकाला गवसणी घातली. सामन्याच्या सुरुवातीपासून अटीतटीची लढत पहायला मिळाली. अखेरच्या १५ ते २० मिनिटात अनुप कुमारचा संघ पिछाडीवर होता. इराण भारताने केलेल्या मागील दोन विश्वचषकातील पराभवाचा बदला घेणार असे वाटत असताना अजय ठाकुरने भारताला पुन्हा आघाडी मिळवून दिली. अजय ठाकूरची खेळीने सामन्याला कलाटणी दिली. त्याच्या खेळीचे भारताचा माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवागने कौतुक केले. ‘यह जस्बा, यह स्पीरीट मुझे दे दे ठाकुर’ असे ट्विट करत सेहवागने आपल्या शैलीत सामनावीर ठरलेल्या अजय ठाकूरचे कौतुक केले. विरु फक्त ठाकुरचे कौतुक करुन थांबला नाही. पराभवाच्या उंबरठ्यावरु विजय मिळवण्याची क्षमता फक्त भारतीय संघामध्ये आहे, अशा आशयाचे ट्विट करुन त्याने भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या.
भारतीय कबड्डी संघावर खेळाच्या मैदानातूनच नव्हे तर सर्व क्षेत्रातुन कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भारतीय संघाला विजयाबद्दल अभिनंदन केले आहे.

ल नेतृत्वाखाली भारतीय संघाने विजयाची हॅट्रिक साजरी केली. भारताच्या विजयासाठी नेटीझन्सनी आज सामन्यापूर्वीच ट्विटरवरुन शुभेच्छा संदेश देण्यास सुरुवात केली होती.