‘कादंबरी’ हा साहित्यप्रकार काळाचा व आशयाचा व्यापक पट उलगडणारा आहे. निव्वळ मराठी कादंबऱ्यांकडे कटाक्ष टाकला तरी हे ध्यानात येऊ शकते. त्या त्या काळाचे संदर्भ, त्यातले राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक आशयद्रव्य कथानकाच्या ओघात आपसूकपणे कादंबरीतून येत असते. त्यात कथापात्रांची सापेक्षता असली तरी कथनांतर्गत काळ व त्याचा पात्रांच्या जगण्यावर असलेला प्रभाव आणि त्याला त्यांनी दिलेला प्रतिसाद यांची एक व्यामिश्र गुंतागुंत कादंबरी वाचकासमोर ठेवत असते. शुक्रतारा प्रकाशनातर्फे प्रकाशित व अनिल देशपांडे लिखित ‘कर्मयोगी’ ही चरित्रात्मक कादंबरी याचे उदाहरण ठरते.

१९१३ ते २०१६ हा या कादंबरीचा कथनकाळ. देशात स्वातंत्र्याचे वारे वाहात असताना शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या नगर जिल्ह्यतल्या कळस गावातील एका आई-मुलाची ही कहाणी आहे. घरामध्ये शिक्षणाची परंपरा नाहीच आणि नवऱ्याचीही संसारात साथ नाही अशा स्थितीत पार्वती सासऱ्याच्या मदतीने घराचा भार उचलते. गरीबीचे चटके सहन करत असतानाच काही प्रमाणात प्राथमिक अक्षरओळख असलेली पार्वती आपल्या मुलांना शिकवण्याचा ध्यास घेते. पण मोठा मुलगा वडिलांच्या वळणावर गेला. त्याने शिक्षण तर घेतले नाहीच, उलट धाकटा सोमनाथ शिक्षण घेतोय म्हटल्यावर त्यालाही त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. त्याचा या शिक्षणाला विरोध होता. सोमनाथच्या शिक्षणाचे समर्थन करणाऱ्या आपल्या आईला- पार्वतीला तो शिवीगाळ करतो. त्यामुळे ती घर सोडून जाते. सोमनाथलाही तो यासाठी मारहाण करतो. मात्र सोमनाथने चिकाटी सोडली नाही. शिक्षण पूर्ण करण्याचे स्वप्न उराशी बाळगत तोही मग घराबाहेर पडतो. नातेवाईकांकडे, ओळखीच्या लोकांकडे राहून तो शिक्षण पूर्ण करतो. सोमनाथच्या या प्रयत्नांना आई- पार्वतीही खंबीरपणे साथ देते.

Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र
lokmanas
लोकमानस: दांभिक नवनैतिकवाद्यांकडून अपेक्षा निरर्थक

या साऱ्या कष्टातून शिक्षण पूर्ण केलेला सोमनाथ पुढे अध्यापनाच्या क्षेत्रात येऊन पुढील काळात कळसकर गुरुजी म्हणून नावारूपास येतो. हे कळसकर गुरुजी पुढे वंचित समाजातील मुलींसाठी ‘सांदिपनी ॠषी बालिकाश्रम’ उभारतात. सोमनाथ तात्याबा कळसकर यांचा सोमनाथ ते कळसकर गुरुजी हा प्रवास उलगडून सांगणारी ही चरित्रात्मक कादंबरी. एका आई आणि मुलाने शिक्षणासाठी केलेला हा संघर्ष आणि त्यात त्यांना आलेले यश याची ही कथा नक्कीच प्रेरणादायी आहे.

‘कर्मयोगी’

– अनिल देशपांडे, शुक्रतारा प्रकाशन, पृष्ठे- ३५१, मूल्य- ३०० रुपये.